
आजच्या डेटिंगच्या दुनियेत फक्त वय किंवा आकर्षक लूक महत्त्वाचा राहिले नाही. विशेषतः जेव्हा गोष्ट ‘Gen Z’ ची येते तेव्हा ते त्यांच्या आवडीनिवडींबाबत खूप स्पष्ट असतात. त्यांच्यासाठी त्यांचा जोडीदार कसा आहे? तो त्यांना किती समजून घेतो आणि नात्याबद्दल त्याचा दृष्टिकोन कसा आहे? या गोष्टी खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. यादरम्यान एक रंजक Gen-z चा नवा ट्रेंड चर्चेत आला आहे. यामध्ये काही Gen Z तरुणींना आपल्या वयाच्या पुरुषांऐवजी मिलेनियल पुरुषांकडे आकर्षित होत आहेत.
यॉर्क व्हिजनने दिलेल्या रिपोर्टनुसार, सुमारे 60 टक्के Gen Z पुरुष सिंगल आहेत, तर Gen Z महिलांमध्ये हे प्रमाण 30 टक्क्यांच्या आसपास आहे. या फरकाचे मुख्य कारण म्हणजे Gen Z तरुणी स्वतःपेक्षा वयाने मोठ्या पुरुषांना डेट करत आहेत. मात्र, इथे मुद्दा फक्त वयाचा नाही, तर दोन्ही पिढ्यांच्या वाढीच्या पद्धतीत असणारा फरक आहे.
मिलेनियल पुरुषांनी त्यांचे बालपण आणि तरुणपणाचा ही काळ अशा वेळी घालवला, ज्यावेळी सोशल मीडिया, डेटिंग ॲप्स आणि ऑनलाइन डेटिंग यांसारख्या गोष्टी त्यांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग नव्हता. त्यांनी मैत्री आणि नातेसंबंध प्रत्यक्ष अनुभव घेऊन आणि संवाद साधून जोडले. याउलट, Gen Z ने लहानपणापासूनच सोशल मीडिया आणि इंटरनेटला आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग म्हणून पाहिले आहे. यामुळेच काही Gen Z तरुणींना मिलेनियल पुरुष अधिक मॅच्युअर, कमी दिखावा करणारे आणि नात्यांबाबत अधिक स्ट्रॉंग वाटू शकतात. त्यांच्यासाठी पार्टनरने प्रत्यक्ष समोर बसून स्पष्ट बोलणे आणि समोरच्याला समजून घेणे जास्त महत्त्वाचे वाटते. त्यामुळेच Gen Z तरुणी अशा जोडीदाराच्या शोधात असतात जो त्यांच्यावर सर्व गोष्टी समजून सांगण्याची जबाबदारी टाकणार नाही. तसेच या मुलींना अशा व्यक्तीसोबत राहायचे आहे. जो नात्यामध्ये समानता, समंजसपणा आणि आदर या गोष्टींना आधीपासूनच महत्त्व देईल.

























































