
वडिलांचा मृत्युपत्राशिवाय मृत्यू झाल्यास हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार मालमत्तेची वाटणी केली जाते. पत्नी, मुलगा आणि मुलगी हयात असतील तर ते प्रथम श्रेणीचे वारस असतात.
वडिलांची आईसुद्धा हयात असेल, तर तीसुद्धा प्रथम श्रेणीची वारस असेल आणि वाट्यात बदल होईल. मृताचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र मिळवणे सर्वप्रथम गरजेचे असते.
सर्व कायदेशीर वारसांनी तहसीलदार किंवा न्यायालयाकडून कायदेशीर वारस प्रमाणपत्र/उत्तराधिकार प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते.
ही कागदपत्रे दाखवून बँक खाती, म्युच्युअल फंड आणि स्थावर मालमत्तेवर कायदेशीर वारसांची नावे लावता येतात. पेन्शन, पीएफ, विमा दावे मिळवण्यासाठी हे वापरले जाते.
मालमत्ता हस्तांतरणासाठी कायदेशीर वारसा प्रमाणपत्र आवश्यक असते. वारसा हक्काने मिळालेली मालमत्ता विकण्यासाठी न्यायालयाचे प्रशासनाधिकार पत्राची गरज भासू शकते.





























































