हे करून पहा – पितृपक्षात पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रोज सकाळी अंघोळ करून पूर्वजांचे स्मरण करत तांब्याच्या पात्रात जल, काळे तीळ आणि दूध घेऊन तर्पण करावे. शक्य असल्यास योग्य ब्राह्मणाकडून पिंडदान करून घ्यावे.

दररोज जेवणाचा पहिला भाग कावळा, गाय, कुत्रा, मुंग्या आणि देवासाठी वेगळा काढून ठेवावा. पितृपक्षात कावळ्याला अन्न देणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

पितरांच्या तिथीला ब्राह्मणांना आदराने घरी बोलवून सात्विक भोजन (कांदा–लसूण विरहित) करवावे आणि आपल्या ऐपतीप्रमाणे दान–दक्षिणा द्यावी.