
शाई होपच्या दणकेबाज नाबाद 162 धावांच्या खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने टीम इंडियावर तिसऱया वन डे सामन्यात पाच विकेट्स राखत सहज विजय साकारला. टीम इंडियाने के.एल. राहुलच्या 129 आणि रोहित शर्माच्या 92 धावांच्या खेळींच्या जोरावर 351 धावा केल्या होत्या. पण गोलंदाज निष्क्रिय ठरल्यामुळे टीम इंडियावर नामुष्कीची वेळ ओढवली. यापूर्वीचे दोन्ही सामने जिंकल्यावर टीम इंडियाने या लढतीपूर्वीच मालिका जिंकलेली होती. त्यामुळे टीम इंडियाने मालिका जिंकली असली तरी त्यांना तिसऱया वन डे सामन्यात पराभव पत्करावा लागला.






























































