
अमृतसर ग्रामीण पोलिसांनी आंतरराष्ट्रीय शस्त्र आणि स्फोटकांची तस्करी करणाऱ्यांच्या नेटवर्कवर मोठी कारवाई करत एका गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईदरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून 1 एके-47 रायफल, एक मॅगझिन, जिवंत काडतुसे आणि 2 अत्याधुनिक हँड ग्रेनेड जप्त केले आहेत. ही कारवाई सुरक्षा यंत्रणांसाठी मोठे यश मानली जात आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे उघड झाले आहे की, अटक करण्यात आलेला आरोपी परदेशातील तस्करांच्या थेट संपर्कात होता. त्यांच्याच मार्फत तो हिंदुस्थानात बेकायदेशीर शस्त्रे आणि स्फोटक सामग्री मागवण्याच्या आणि पुरवण्याच्या गंभीर गुन्ह्यात सक्रियपणे गुंतलेला होता. या प्रकरणी अमृतसर येथील घरिंदा पोलीस ठाण्यात शस्त्र कायदा (Arms Act) आणि स्फोटक पदार्थ कायद्याच्या (Explosive Substances Act) संबंधित कलमांरम्यान गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या संपूर्ण रॅकेटचे जाळे कुठेकुठे पसरले आहे, याचा छडा लावण्यासाठी तसेच या गुन्हेगारी साखळीतील मागील आणि पुढील दुवे (Forward and Backward Linkages) शोधण्यासाठी पोलीस सध्या कसून तपास करत असल्याची माहिती अशी माहिती पोलीस महासंचालकांनी सोशल मीडियावरील ‘एक्स’वरील पोस्टमध्ये दिली.
In a major breakthrough, Amritsar Rural Police dismantles an illegal arms & explosives supply network, apprehends one accused and recovers 1 AK-47 rifle, a magazine, live cartridges & 2 hand grenades.
Preliminary investigation reveals that the accused is allegedly linked to foreign-based smugglers and is involved in procuring illegal weapons.
An FIR has been registered at PS Gharinda, Amritsar, under relevant sections of the Arms Act & Explosive Substances Act. Further investigation is underway to uncover the complete network and establish backward & forward linkages.
@PunjabPoliceInd remains committed to maintaining strict vigil against illegal arms trafficking, organised criminal networks and taking firm action against those involved in the illegal supply chain.
— DGP Punjab Police (@DGPPunjabPolice) October 4, 2026
दरम्यान, पंजाब पोलिसांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून दिलेल्या माहितीनुसार, राज्यात अवैध शस्त्र तस्करी आणि गुन्हेगारी नेटवर्कवर करडी नजर ठेवली जात आहे. अवैध पुरवठा साखळीत सामील असलेल्या प्रत्येक देशविघातक घटकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पंजाब पोलीस पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे पोलिसांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.


























































