
रत्नागिरी शहरातील थिबा पॅलेस येथील थ्री डी मल्टीमिडिया शो च्या कार्यवाही आणि देखभालीसाठी ठेकेदार कंपनीने दिलेले दरपत्रक अपेक्षेपेक्षा अधिक असल्याने ठेकेदारासोबत वाटाघाटी सुरू आहेत. थ्री डी मल्टिमिडिया शो चा खर्च वाजवी आणि रत्नागिरी नगरपरिषदेच्या आर्थिक क्षमतेच्या मर्यादित राहिल याची दक्षता घेण्यात येत असल्याचे रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी सांगितले आहे. नुकत्याच झालेल्या रत्नागिरी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत थ्री डी मल्टिमिडियाच्या अवास्तव खर्चावरून संताप व्यक्त केला होता त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.
मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज, कोकणातील भारतरत्नांचा आणि थोर व्यक्तींचा समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माहिती देणारा थ्री डि मल्टिमिडिया शो वारसा संवर्धन आणि जनजागृतीचा उपक्रम आहे. त्यामुळे या उपक्रमाचे तोटा या आर्थिक निकषांतून पहाता येणार नाही, असे गारवे यांनी सांगितले.
रत्नागिरीतल्या थिबा पॅलेसचा काय आहे इतिहास? – https://youtu.be/vIl_H8YHf9M?si=-wRkglyOUaFMztRv





























































