
बेस्ट बसमध्ये होणाऱ्या गर्दीचा गैरफायदा घेत प्रवाशांचे मोबाईल लांबवणारी टोळी गावदेवी पोलिसांनी जेरबंद केली. टोळीच्या म्होरक्याला राजस्थानातून पकडण्यात आले. बेस्ट बसमध्ये मोबाईल चोरणारी एक टोळी असून त्यातले पंटर हे मानखुर्द, शिवाजीनगर परिसरात राहत असल्याची खबर गावदेवी पोलिसांना मिळाली. त्यानुसार सदर परिसरामध्ये धडक देऊन पोलिसांनी आफताब अन्सारी, हसन शेख, चाँद मोहम्मद सुलतान, इम्तियाज शेख, आझम कुरेशी, स्वप्नील सोनावणे, रजब अली शेख ऊर्फ चिकणा या आरोपींना पकडण्यात आले तर टोळीच्या म्होरक्याला राजस्थानातून उचलून आणले. या टोळीकडून चोरलेले 16 लाख किमतीचे 42 महागडे पह्न हस्तगत केल्याचे उपायुक्त रागसुधा आर यांनी सांगितले.


























































