
अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद, बोरिवली शाखेतर्फे आयोजित कलारजनी पुरस्कार सोहळय़ात रंगभूमीवरील दीर्घकाळ योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच या सोहळय़ात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा विशेष गौरव करण्यात आला.
अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद, बोरिवली शाखेतर्फे आयोजित हा सोहळा प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहात पार पडला. नाटय़छटाकार दिवाकर यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून हा सोहळा साजरा केला जातो. बोरिवली शाखेचे अध्यक्ष प्रभाकर (गोटय़ा) सावंत आणि कार्यकारिणीच्या योगदानामुळे हा कार्यक्रम उत्तमरीत्या पार पडला.
या सोहळय़ाला मुंबईचे उपमहापौर संजय घाडी, मुंबई महापालिकेचे गटनेते गणेश खणकर, शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, विलास पोतनीस, भूषण पाटील, अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे विश्वस्त अशोक हांडे, परिषदेचे उपाध्यक्ष मोहन परब, प्रमुख कार्यवाह दामोदर टेंबुलकर आदी उपस्थित होते.
संजय मोने, निवेदिता सराफ यांचाही गौरव
संजय मोने, निवेदिता सराफ, केदार शिंदे, प्रियांका बर्वे, रामनाथ थरवळ, भालचंद्र कुबल, नंदलाल रेळे, क्षितिज पटवर्धन, संचित वर्तक, विश्वास सोहनी-आविष्कार नाटक (सांगत्ये ऐका), विजय साळुंके यांचाही सन्मान करण्यात आला.



























































