Nana Patekar नाना पाटेकर यांचे निधन, चित्रपसृष्टी हळहळली; कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ट अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. गेल्या पन्नास वर्षांपासून चित्रपटसृष्टीवर राज्य करणाऱ्या नाना पाटेकरांच्या अकाली निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. हिंदी, मराठी, दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

रितेश देशमुख –
आज शब्द थिजले आहेत, काळजावर जणू वीज कोसळली आहे. नाना गेले… या एका वाक्याने मन सुन्न, निःशब्द झाले आहे. तुम्ही अभिनयाचे आकाश होतात, ज्याला सीमा नव्हती. तुमच्या अनोख्या शैलीने रसिकांच्या हृदयात तुम्ही अढळ घर केले. कधी पडद्यावरचा तेजस्वी नायक, कधी अंगावर शहारे आणणारा खलनायक, तर कधी गंभीर चेहऱ्यामागचा खट्याळ विनोद, प्रत्येक रंग तुमच्या अभिनयात खुलून आला. पडद्यावर तुम्ही हीरो होतात, पण पडद्यामागे त्याहूनही मोठे. तुमच्या संस्थेतून वाहत राहिली माणुसकीची निरंतर धारा. ‘ब्लफमास्टर’ आणि ‘हाउसफुल ५’ मध्ये तुमच्यासोबत पडदा वाटून घेतला, हे माझे भाग्य. पण एका मराठी चित्रपटात तुमच्यासोबत काम करणे झालेच नाही ही खंत कायम मनात राहिल. तुमच्या गप्पा, पाठीवरची ती कौतुकाची थाप, सोबत घालवेलेले ते क्षण ही माझी खरी कमाई, खरच आज एका युगाचा अस्त झाला आहे, अशी प्रतिक्रिया रितेश देशमुख यांनी दिली.

अक्षय कुमार –
नानांच्या निधनाचे वृत्त ऐकून मन अत्यंत दुःखी झाले. ते अशा मोजक्या अभिनेत्यांपैकी एक होते, ज्यांना प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी फार काही करावे लागत नसे. तो धीरगंभीर आवाज, जबरदस्त अभिनय आणि प्रत्येक पात्रातील सहज प्रामाणिकपणा… त्यांची स्वत:ची एक वेगळी शैली होती. ‘वेलकम’ आणि नुकत्याच झालेल्या ‘हाऊसफुल ५’ मध्ये त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. त्या सेटवरच्या अशा अनेक आठवणी आहेत, ज्या मी आयुष्यभर मनात जपून ठेवीन. नाना पाटेकर खरोखरच अद्वितीय होते. नाना आता आपल्यात नाही यावर विश्वास ठेवणे कठीण जात आहे. तुमची उणीव शब्दांत व्यक्त करता येणार नाही इतकी भासेल, असे अक्षय कुमारने ट्विट केले आहे.

मनीषा कोईराला –
एका महान अभिनेत्याच्या, प्रभावी व्यक्तिमत्त्वाच्या आणि अभिनय क्षेत्रातील एका खऱ्या आधारस्तंभाच्या निधनाने मन अत्यंत दुःखी झाले आहे. सिनेमासृष्टीतील त्यांचे योगदान आणि त्यांचे कलेप्रती असलेले समर्पण सदैव स्मरणात राहील

संजय दत्त –
माझा भाऊ, माझा मित्र नाना आता आपल्यात नाही यावर अजूनही विश्वास बसणे कठीण जात आहे. आम्ही एकत्र घालवलेल्या क्षणांच्या अशा अनेक सुंदर आठवणी आहेत, ज्या मी आयुष्यभर मनात जपून ठेवीन. त्यांचे जाणे ही केवळ त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या आणि त्यांना ओळखणाऱ्यांचीच नव्हे, तर संपूर्ण चित्रपटसृष्टीची फार मोठी हानी आहे. आपण एका असामान्य अभिनेत्याला, एका महान कलाकाराला आणि एका खरोखरच अत्यंत खास व्यक्तीला गमावले आहे. माझ्या संवेदना आणि प्रार्थना त्यांच्या कुटुंबासोबत व आप्तेष्टांसोबत आहेत. भावपूर्ण श्रद्धांजली, नाना.

सचिन तेंडुलकर –
नाना पाटेकर हे मला अत्यंत स्पष्टवक्ते आणि जमिनीशी जोडलेले व्यक्तिमत्त्व म्हणून आठवतात. त्यांच्या कामामधूनही तोच प्रामाणिकपणा दिसून यायचा. मग ते मराठी असो वा हिंदी, त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेत नेहमीच एक जिवंतपणा आणि वास्तवता आणली. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मन अत्यंत दुःखी झाले. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि आप्तेष्टांच्या दुःखात मी सहभागी आहे. ॐ शांती.”