
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक मान्यवरांनी आणि कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आता नाना पाटेकर यांचे तीन दिवसांपूर्वीचे गोव्यातील एक भाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. जायचं आहेच, मीही उद्या आहे नाही, माहिती नाही…, असे नाना पाटेकर या भाषणात म्हणाले होते.
जायचं आहेच, मीही उद्या आहे नाही माहिती नाही…; नाना पाटेकर यांचे गोव्यातील 3 दिवसांपूर्वीचे अखेरचे भाषण https://t.co/FqzMW3NYy8
— Saamana Online (@SaamanaOnline) October 8, 2026
गोव्यात आयोजित एका कार्यक्रमात दिवंगत मनोहर पर्रिकर यांच्याबाबत बोलताना नाना पाटेकर यांचा कंठ दाटून आला होता. मनोहर पर्रिकर माझे मित्र होते. अभिमान वाटावा असा माणूस होता. आणि तो माझा मित्र होता. अरे तुरेचा मित्र, माझ्यापेक्षा लहान होता वयाने. मी आता ७६ पूर्ण आणि ७७ वय सुरू होईल. दुर्दैवं आपलं इतक्या लहान वयात माणूस गेला, असे नाना पाटेकर म्हणाले होते.
जायचं आहेच, मीही उद्या आहे नाही माहिती नाही. प्रत्येकाच्या आयुष्यमध्ये तो एक काळ येणारच. पण त्याच्या आधी मला जे करायचं ते मी करू शकतोय का? मी प्रयत्न केले का? माझ्या पुरता जर मर्यादित असेल माझी मुलं, माझी बायको, माझं घर याच्यापुरताच जगायचं असेल तर मग जग आणि मर, असे नाना पाटेकर म्हणाले.




























































