महाराष्ट्राच्या सहकार धोरणाच्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीस ॲड. दीपक पटवर्धन निमंत्रित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय सहकार धोरण 2025’ च्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याच्या सहकार धोरणात आवश्यक बदल व सुधारणा सुचविण्यासाठी गठित करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीची बैठक गुरुवार, दि. 22 ऑक्टोबर रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून राज्यातील पतसंस्था क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे ॲड. पटवर्धन यांना या बैठकीत पतसंस्थांच्या विकासासंबंधीच्या अपेक्षा, अडचणी आणि धोरणात्मक सुधारणांबाबत सूचना मांडण्याची संधी मिळणार आहे.बैठकीस सहकार विभागाचे वरिष्ठ अधिकारी, सहकारी बँकांचे प्रतिनिधी तसेच राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय सहकार संस्थांचे पदाधिकारी निमंत्रित आहेत.निमंत्रित प्रमुख प्रतिनिधीमध्ये सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, तसेच सहकार क्षेत्रातील विविध संस्थांचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे.