माझी मुलगी तुमच्या ताब्यात दिलीय तिला सांभाळा, नाना पाटेकर यांच्या वक्तव्याची चिपळूणकरांना आठवण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जुलै २०२१ मध्ये महापूराने चिपळूणला वेढा घालून उध्वस्त केले होते. महापुराचे संकट चिपळूणकर पुन्हा येऊ नये म्हणून चिपळूण बचाव समितीने सलग २८ दिवस आंदोलन छेडले होते. या आंदोलनाची हाक नाना पाटेकरांच्या कानावर गेली आणि नाम फाऊंडेशन चिपळूणच्या मदतीसाठी सरसावली होती. शिवनदीतील गाळ काढण्याच्या उद्घटनावेळी अभिनेते नाना पाटेकर उपस्थित होते. त्यावेळी “माझी मुलगी तुमच्या ताब्यात दिलीय तिला सांभाळा” असे त्यांचे उद्गार चिपळूणकरांना आज आठवले. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी कळताच चिपळूणकरांना अश्रू अनावर झाले नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून चिपळूणला पुराच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी नाम फाऊंडेशनने केलेल्या मदतीची आणि नाना पाटेकर यांच्या आठवणीं आज पुन्हा ताज्या झाल्या.

शिवनदी आणि वशिष्ठी नदीतील गाळ काढण्यासाठी अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या पुढाकाराने नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून चिपळूणला मदत मिळाली होती. २०२२ साली शिवनदीतील गाळ काढण्याच्या शुभारंभप्रसंगी स्वता अभिनेते नाना पाटेकर उपस्थित होते. आज सकाळी अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी समजताच चिपळूणकर हळहळले. नाम फाऊंडेशच्या सहकार्याने चिपळूणला पुराच्या विळख्यातून बाहेर काढण्यात नाना पाटेकर यांचे सहकार्य चिपळूणकर कधीही विसरणार नाहीत. शिवनदी तील गाळ काढण्याच्या शुभारंभाप्रसंगी गाळ उपसण्याची सर्व यंत्रणा ताब्यात दिली तेव्हा नाना पाटेकर म्हणाले होते की, ”माझी मुलगी तुमच्या ताब्यात दिली आहे तिला सांभाळा” हे नाना पाटेकरांच्या भारदस्त आवाजातील हे वाक्य पुन्हा चिपळूणकरांना आठवले. नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक नद्यांमधील गाळ काढण्यात आला होता. वृक्षारोपणही करण्यात आले होते.