एआयच्या मदतीने हायकिंगला गेला अन् रस्ता भरकटला, हेलिकॉप्टरच्या सहाय्याने किशोरवयीन मुलाची सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एआयच्या मदतीने मार्ग निश्चित करून हायकिंगला गेलेला 16 वर्षीय मुलगा उंच कड्यावर अडकला. ट्रेकिंगदरम्यान तो रस्ता भरकटल्याने उंच आणि तीव्र उताराच्या कड्यावर अडकला. अखेर हेलिकॉप्टरच्या सहाय्याने त्याची सुटका करण्यात आली. ब्रायस विन्सेंट गौरीलुक असे सुटका करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, ब्रायस हा ब्रिटीश कोलंबियातील क्राउन माउंटेनवर हायकिंगसाठी गेला होता. हायकिंगसाठी त्याने एयआची मदत घेतली. एआयच्या मार्गदर्शनानुसार ब्रायस हायकिंगला गेला. ग्राउस माउंटेनपासून त्याने आपली मोहीम सुरू केली. त्याला क्राउन माउंटेनपर्यंत पोहोचायचे होते. मात्र पुढे जाताना क्राउन हायकिंग मार्गावरून भरकटला आणि विडोमेकर मार्गावर अडकला.

अडकलेल्या गिर्यारोहकाने मदतीसाठी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर नॉर्थ शोर रेस्क्यू पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. अखेर अनेक तास पर्वतावर अडकून पडल्यानंतर हेलिकॉप्टरच्या सहाय्याने त्याला सुरक्षितपणे खाली आणण्यात आले.