Ratnagiri News – रत्नागिरी शहरात 12 ऑक्टोबरपासून पाणी कपात, दर सोमवारी पाणी पुरवठा बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुष्काळाच्या संकटामुळे रत्नागिरी नगर परिषदेने 12 ऑक्टोबर पासून पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. दर सोमवारी रत्नागिरी शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच नियमित पाणीपुरवठ्याच्या वेळेत 15 मिनिटांची कपात करण्यात येणार असल्याची माहिती पाणी सभापती निमेश नायर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

अल-निनोच्या संकटामुळे दुष्काळाचे सावट पसरले असताना पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यापर्यंत पाणीपुरवठा सुरू रहावा या हेतूने रत्नागिरी नगरपरिषदेने पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात आज 3.327 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. बाष्पीभवनामुळे हा पाणीसाठा कमी होत असल्याने तातडीने पाणी कपातीचा निर्णय घ्यावा लागला असल्याचे नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी सांगितले.

पाण्याची पर्यायी व्यवस्था म्हणून नाचणे येथील तलाव आणि निवखोल येथील विहिरी नगरपरिषद ताब्यात घेणार आहे. तसेच शीळ येथे पूर्वीची जॅकवेल होती त्याठिकाणी असलेली विहिरीतून पाणी घेणार असल्याचे निमेश नायर यांनी सांगितले. गाड्या धुणारे रॅम्प आणि जलतरण तलाव यांना नोटीस देऊन त्यांचा पाठपुरावा नगरपरिषद बंद करणार आहे.