पोलिसांनी नौकेतून घेतला बेपत्ता मुलीचा शोध, नाणार खाडीपात्रातील दुर्घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाणार-इंगळवाडी येथिल खाडीपात्रात कालवं काढण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबातील तीन अल्पवयीन मुलांचा खोल पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. एक मुलगी अद्यापही बेपत्ता असून जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आज एका नौकेतून त्या मुलीचा शोध घेतला.

या गंभीर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षकनितीन दत्तात्रय बगाटे,अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांनी तात्काळ नाटे येथील घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली तसेच संबंधित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून समुद्रकिनारे, खाडीपात्रे, नद्या व अन्य जलक्षेत्रांमध्ये वावरताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले तसेच पाण्याची खोली, पाण्याचा प्रवाह तसेच भरती-ओहोटीचा अंदाज न आल्याने अशा ठिकाणी दुर्घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षिततेकडे लक्ष देण्याबाबत आणि धोकादायक जलक्षेत्रांमध्ये आपल्या लहान मुलांना एकटे सोडण्यात येऊ नये, अथवा जाण्यास मज्जाव करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.