
इंडियन सुपर लीगच्या 2026-27 हंगामात नॉर्थईस्ट युनायटेड आणि मोहन बागान सुपर जायंट यांच्यात 12 ऑक्टोबरला सामना होणार आहे. नॉथईस्टला मागील आयएफए शील्ड उपांत्य सामन्यात ईस्ट बंगालकडून 2-7 असा मोठा पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे घरच्या मैदानावर दमदार पुनरागमन करण्याचे आव्हान संघासमोर आहे. दुसरीकडे, मोहन बागानने आयएफए शील्डचे विजेतेपद पटकावले आहे. त्यामुळे या लढतीत कोण बाजी मारणार, याची उत्सुकता वाढली आहे.


























































