मुंब्य्रातील मुस्लिम बांधवांच्या हाती शिवसेनेची मशाल, नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा निर्धार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंब्य्रातील असंख्य मुस्लिम बांधवांनी आज शिवसेनेची मशाल हाती घेतली. या सर्वांचे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी स्वागत केले. मुंब्य्रात शिवसेनेची ताकद वाढवण्याचा निर्धार करण्यात आला असून येथील नागरी समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाहीदेखील देण्यात आली.

मुंब्य्राच्या प्रभाग क्रमांक 33 मधील अनेक प्रमुख पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनाच आम्हाला न्याय देऊ शकेल याची खात्री असून 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या ध्येयानुसार वाटचाल करणार असल्याचे सांगण्यात आले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की, मुंब्य्रातील मुस्लिम बांधव शिवसेनेत आल्याने आपली ताकद आणखी मजबूत होणार असून जनसेवेचे कार्यदेखील वेगाने पुढे जाईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी विधानसभा संपर्कप्रमुख सय्यद साठविलकर, महिला जिल्हा संघटक कल्पना कावळे, उपजिल्हाप्रमुख विजय देसाई, युवासेना जिल्हा-युवाधिकारी प्रतीक पाटील, उपजिल्हा युवाधिकारी स्वप्नील पावशे, प्रभात देसाईकर, अनिश कुरेशी, बबलू जी, रियाझ रिझवी, नजर अब्बास, भानू शेख, आबाद सय्यद, यार मोहम्मद, शाहीन घडियाल यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

यांनी केला प्रवेश

गुलाम खान (साहिल खान), सगीर खान, मुन्ना खान, फैजान खान, समीर अश्रफ, खालिद, आबाल अन्सारी, शेड भोर, अर्श सय्यद, शारुख शेख, शाहिद शेख, रेयान शेख, जबल शेख, जुनैद अख्तर खान, अधिज चौधरी, जुनूद खानू, सीता पर्वतारोही, रितू सोनी, शाहधन परवीन शेख, जूर आयशा, रिवाना चौधरी, सना शेख, नफिसा खान, मोहम्मद अली खान, साजिद शेख, निजाम खान, शाफ बंद आणि मोहम्मद सिद्धिकी (बाबूभाई).