
हिंदुस्थानची युवा टेनिसपटू मायाया राजेश्वरनने पोर्तुगालमधील लागोस येथे डब्ल्यू 35 स्पर्धेत दुहेरीचे विजेतेपद पटकावले. येलिझावेता कोटलियार हिच्यासोबत खेळताना हिंदुस्थानी खेळाडूने अंतिम सामन्यात 0-6, 6-2, 10-7 असा विजय मिळवला. पहिला सेट गमावल्यानंतर जोरदार पुनरागमन करत जोडीने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. पिछाडीवरून विजय मिळवण्याची ही झुंज हिंदुस्थानी टेनिससाठी आनंदाची बातमी ठरली.


























































