
रत्नागिरी जिल्ह्यात यंदा पावसाचे अल्प प्रमाण आहे. आतापर्यंत जिल्ह्यात फक्त ७७ टक्के पाऊस पडला आहे.रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी २ हजार ६२३ मिमी पाऊस पडला असल्याने भविष्यात पाणीटंचाईचे मोठे संकट उभे राहणार आहे. ज्यागावात मार्चमध्ये पाण्याचे टॅंकर धावू लागतात त्याठिकाणी डिसेंबर महिन्यापासूनच पाणी टंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यापर्यंत सुमारे सवा तीन ते साडेतीन हजार मिमी पाऊस पडतो.यंदा ऑगस्ट महिन्यापासून पावसाने पाठ फिरवल्याने आतापर्यंत २ हजार ६२३ मिमी पाऊस पडला आहे. म्हणजे सरासरी ७७ टक्के पाऊस पडला आहे.सर्वाधिक कमी पाऊस संगमेश्वर तालुक्यात ६६.६५ टक्के पडला आहे.पाठोपाठ राजापूर तालुक्यात ६८.४५ टक्के पाऊस पडला आहे.मंडणगड तालुक्यात ७१.५५ टक्के,दापोली ८०.६०, खेड ९४.७८,टक्के गुहागर ८८.३९ टक्के,चिपळूण ८९.८१ टक्के, रत्नागिरी ७२.५२ टक्के, लांजा ७०.८० टक्के पाऊस पडला आहे.
साडेतीन हजार मिमी पाऊस पडूनही रत्नागिरी जिल्ह्यात मार्च महिन्यापासून पाणीटंचाई सुरू होते. यंदा अडीच हजार मिमी पाऊस पडल्याने डिसेंबर महिन्यातच पाणी टंचाईची भीती निर्माण झाली आहे.



























































