
आपल्या गावाचा सर्वांगीण विकास करून घेण्यासाठी विकासकामे करणाऱ्या आणि अडीअडचणीला आपल्या सोबत असणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन करून ग्रामीण भागातील नागरिकांना शहरांप्रमाणेच दर्जेदार आरोग्यसेवा, पाणीपुरवठा, रस्ते आणि इतर मूलभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहिलो आहोत. विकासकामे करताना राजकारणापेक्षा जनहिताला प्राधान्य दिले असून, कामाच्या गुणवत्तेशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड केली नाही, असे प्रतिपादन शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी केले.
भास्कर जाधव यांच्या प्रयत्नातून झालेल्या 58 लाख रुपये खर्चाच्या तालुक्यातील वैजी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचा भूमिपूजन सोहळा भास्कर जाधव यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी संपन्न झाला. या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना आ.जाधव बोलत होते.यावेळी आ.भास्कर जाधव,शिवसेना तालुकाप्रमुख सुभाष जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव, गावचे सुपुत्र संतोष मोरे, विभागप्रमुख नितीन निकम, उपविभागप्रमुख नंदू चव्हाण, फैय्याज शिरळकर, मिलिंद शिर्के, सरपंच संदीप बांद्रे, जि.प सभापती मयुरी शिर्के,तालुका वैद्यकीय अधिकारी ज्योती यादव,ठेकेदार अभिजित जाधव,शिवसेना विभाग प्रमुख नितीन निकम व्यासपीठावर उपस्थित होते.कामाच्या दर्जाशी तडजोड नाहीविकासकामांची गुणवत्ता तपासणे ही आपली कायमची भूमिका असल्याचे स्पष्ट करत जाधव म्हणाले की, कंत्राटदार कोण आहे किंवा त्याचे राजकीय संबंध काय आहेत, यापेक्षा त्याने केलेल्या कामाचा दर्जा महत्त्वाचा आहे.काम चांगले असो अगर नसो मी कोणालाही प्रमाणपत्र देणार नाही. जनतेच्या पैशातून उभारल्या जाणाऱ्या प्रत्येक सुविधेचा टिकाऊपणा आणि उपयोगिता जपली पाहिजे. ग्रामीण भागातील ग्रामस्थांना शासनाने आरोग्यविषयक अनेक सुविधा आणि योजना दिल्या आहेत या सर्वांचा आपण परिपूर्ण लाभ घेतला पाहिजे. ग्रामस्थांना भविष्यात अधिक चांगल्या आरोग्य सुविधा मिळतील असे प्रतिपादन चिपळूण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.ज्योती यादव यांनी मार्गदर्शन करतांना केले.
शिवसेना विभाग प्रमुख नितीन निकम यांनी पंचक्रोशीत आ.भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आपण केलेली विकास कामे आणि सामाजिक कार्य या विषयी माहिती दिली. यावेळी नंदू चव्हाण, मिलिंद शिर्के, संदीप जाबरे, शाखाप्रमुख कल्पेश मोरे, रुपेश शेलार, चंद्रकांत शिर्के, उपशाखाप्रमुख बबलू राऊत, विजय कदम, ग्रामसेवक आकाश दांडगे, पोलीस पाटील सतीश मोहिते, देवस्थानचे मुख्य विश्वस्त कृष्णा सीताराम मोरे, वैजी शाळेच्या शिक्षिका निकिता खेतले, अंगणवाडी सेविका शीतल मोहिते, आरोग्य विभागाचे अधिकारी, तसेच स्थानिक ग्रामस्थ समितीचे सदस्य सुशील निकम, अमेंद्र मोरे, मंगेश भडवळकर, संतोष मोहिते, मनोहर मोरे आणि गावातील स्थानिक व मुंबईकर मंडळी उपस्थित होते.




























































