
मुंबईतील मैदाने आणि भूखंड वाचवण्यासाठी वांद्र्यात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात जोरदार तिरंगा आंदोलन करण्यात आले. वांद्रे रंगशारदा येथील नेव्हील डिसोझा फुटबॉल ग्राऊंड येथे झालेल्या आंदोलनात आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील मोकळे भूखंड ढापण्याच्या सरकारच्या वृत्तीचा निषेध केला. आंदोलनात भूखंड ढापाढापीचा निषेध करून भाजपला ‘रेड कार्ड’ दाखवण्यात आले.मुंबईतील मोकळे भूखंड बिल्डर-कंत्राटदार मित्रांच्या घशात घालण्याचे धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सुरू असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.
2034 चा डेव्हलपमेंट प्लॅन 2017 मध्ये बनला तेव्हा उद्धव साहेबांनी आपल्या नगरसेवकांना आणि महापौरांना सांगितलं होतं की, एकही मैदान हे बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरच्या हातात द्यायचं नाही मैदान हे मैदानच राहिलं पाहिजे. मैदान , स्पेशल डेव्हलपमेंट झोन असेल, एनडीसी, एसडीजी हे बदलायचे नाहीत. आपलं सरकार आल्यानंतर देखील उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की जे मुंबईमध्ये सगळा जो काही प्लॅन आहे तो तसा तसा राहिला पाहिजे. कुठेही मैदान गेली नाही पाहिजेत,अशी आमची स्पष्ट भूमिका होती.
मुंबईत जी मैदान होती ती कमी होत चालली आहेत, झाडं कमी होत चालली आहेत आणि तिथे सगळीकडे बिल्डिंग होत आहेत.विकास हा झालाच पाहिजे. मात्र, त्यासाठी खेळाची मैदाने ताब्यात घेण्याची गरज नाही.
सहा एकरवर हा सगळा प्लॉट पसरला होता. हे इथे ट्रानझिट कॅम्प असेल, बाजूला झोपडपट्टी होती. हे मोकळं मैदान होतं, आम्ही हा भुखंड फुटबॉलला दिला होता. आम्ही हे साफ करून दिलं. आम्ही मुंबई फुटबॉल असोसिएशनला दिलं. आज त्या राजकीय लोकांना मला प्रश्न विचारायचा आहे की, भूखंड आरक्षित करताना बाकीचं मैदान हे खेळासाठी इकडच्या तरुण तरुणींसाठी मोकळं का नाही ठेवलं? असा सवाल त्यांनी केला.
ही लढाई जी आहे, आज सुरुवात केलेली आहे. मुंबईकर वर्ग हा रस्त्यावर उतरून आपल्या मोकळ्या मैदानांसाठी लढणार आहे. जर इथे थांबायला लावलं नाही तर मुंबई महानगरपालिकेच्या चौकात येऊन आम्ही सगळे बसू आणि जोपर्यंत आपली आमची मैदान परत मिळत नाही आम्ही तिथून हलणार नाही कितीही वेळ लागला तरी आम्ही तिथून हलणार नाही, असेही आदित्य ठाकरे यांनी ठणकावले.
इथे कन्वेशन सेंटर तुम्ही करत आहात, इथे रंगशारदाला तुम्ही नोटीस दिलेली आहे. ते पण तुम्हाला ढापायचं आहे. पाली हिलमध्ये पण एक मोकळं मैदान होतं, तिथे पण जनतेचा पैसा डीपीसीचा पैसा वापरून तिथे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करून तिथे आता बांधकाम सुरू केलेलं आहे. तो लढा पण आम्ही देणार आहोत.
सिक्युरिटी मेंटेनन्ससाठी मैदान दिले आहे तर ते पण मैदान प्रायवेटाईज करायचं, असे यांचे सुरू आहे. अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तिथे परवाच मी जाऊन आलो. मोकळा मैदान मोठा मैदान आहे. मुंबई महानगरपालिकेत सत्ता असताना आपण तिथे ते मैदान स्वच्छ करून घेतलं. सगळ्यांना खेळण्यासाठी मोकळं मैदान केलं तिथे क्रिकेटचा ग्राउंड केलं वॉकिंग ट्रॅक केलं सायक्लिंग ट्रॅक केलं तिथे टेनिसचं पण कोर्ट आहे आणि मी पर्यावरण मंत्री असताना तिथे आपण अर्बन फॉरेस्ट केलं होतं. पण आता काय करतात तिथे अंधेरीचा प्लॉट आता जवळपास 950 कोटीचा प्लॉट आहे तो प्लॉट एका ट्रस्टला दिलेला आहे. तो प्लॉट 21 लाख पर इयर या किमतीला एका ट्रस्टला दिलेला आहे. दुसरे दोन म्हाडाचे प्लॉट्स फ्री ऑफ कॉस्ट त्याच ट्रस्टला दिलेत.
आज मुंबईमध्ये मोठ्या मोठ्या इमारती येत आहेत. एक्झिबिशन सेंटर असतील, मॉल असतील हे सगळं आलच पाहिजे, पण पण जो विकास होतोय, तो शाश्वत असायला पाहिजे. हे जे मैदान आहे नेवेल झिसूझा फुटबॉल टफ गेले जवळपास नऊ ते दहा वर्ष आम्ही इथे मुंबई फुटबॉल असोसिएशन म्हणून फक्त आणि फक्त फुटबॉल खेळत आलेलो आहे. दुसरा कुठचाही सामाजिक राजकीय कार्यक्रम केला नाही.
बीएमसीने अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स घेऊन टाकले आहे. सेंट झवियर्स ग्राउंड देखील घ्यायला निघाले आहे. आम्ही तिथे लढा चालू आहे आमचा. मुख्यमंत्री महोदय आज मी तुम्हाला थेट सवाल करतो. तुम्ही आज सकाळी कुठेतरी जे बरोबर बोलत होतात असं मी ऐकलं आणि त्याच्यात मुख्यमंत्री बोललेत की निश्चित बच्चोंने स्क्रीन से ज्यादा मैदान मे होना चाहिए, असं फडणवीस साहेब बोललेत. मुख्यमंत्री महोदय स्क्रीनवर नसायला पाहिजे आणि मैदानात असायला पाहिजे. मैदान तुम्ही ठेवताय कुठे? ही मागची एसआरए तुमच्या मित्राच्या घशात टाकलेली आहे. बाजूचा प्लॉट तुमच्या आमदाराच्या घशात टाकलेला आहे. अंधेरी आणि जूहू मधले तीन प्लॉट्स भाजपच्याच आमदाराच्या घशात टाकले आहेत. सगळे तिथे विरोध करतात तिकडचे एलएम विरोध करतात ते देखील कोर्टात गेलेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
मी हायकोर्टचे खरोखर मनापासून आभार मानतो. मुंबई महानगरपालिका आणि भाजपा अशी मैदान गिळायला निघालेले आहेत त्यांना स्टेटस कोचा आदेश दिलेला आहे. आमचा कायदेशीर लढाई ही चालू राहणार पण आज आपल्याला ठरवायला पाहिजे. आपल्याला एकत्र यायलाच लागणार. आपल्याला आपल्या मुंबईसाठी सगळे भेदभाव बाजूला ठेवून तिरंगा हातात घेऊन एकत्र यावाच लागेल. मुंबईसाठी आपण एकत्र आलो नाही तर मुंबई आपली हे गिळून टाकतील, असा इशारा त्यांनी दिला.
मुलुंड असेल, कुलाबा असेल, सगळीकडचे जे प्लॉट असतील, प्रभादेवीतला आपल मैदान आहे ,अंधेरीत आहे, त्यासाठी आपल्याला लढा द्यायचा आहे. तुम्ही मुंबईकर म्हणून एकमेकांना साथ देणार की नाही? मुंबईची मोकळी मैदानाची भाजप ढापायला निघालेली आहेत तुम्ही एकत्र येऊन लढणार की नाही?
जिथे जिथे तुम्हाला तुमचे आमदार, खासदार भेटतील, नगरसेवक भेटतील, त्यांना सांगा माझी मुंबई तुम्ही वाचवली पाहिजे माझ्या मैदानांसाठी तुम्ही आवाज उठवलाच पाहिजे तर आणि तरच तुम्ही माझे लोकप्रतिनिधी आहात. या प्रोटेस्टला आपण रेड कार्ड प्रोटेस्ट नाव दिले आहे,चला मुंबईची मोकळी मैदाने ढापायला निघालेल्या भाजपला रेड कार्ड देण्याची वेळ आली आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.






















































