अब्दुल सत्तार भाजपच्या वाटेवर? मुख्यमंत्र्यांची भेट घेतली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

संभाजीनगर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसतर्फे आमदार सुभाष झांबड यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे नाराज झालेले जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार हे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. सत्तार यांनी शनिवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे अब्दुल सत्तार हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

सत्तार आणि मुख्यमंत्री यांच्या भेटीवेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री गिरीश महाजनही उपस्थित होते. यावेळी त्यांच्यात काही काळ चर्चा झाली. यानंतर कार्यकर्त्यांशी बोलून मगच पुढील निर्णय घेणार असल्याचं अब्दुल सत्तार यांचं म्हणणं आहे.

शनिवारी संभाजीनगर लोकसभा मतदार संघातून आमदार सुभाष झांबड यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यांनतर अवघ्या 8 तासातच काँग्रेस पक्षातील वाद उफाळून आला. त्यात सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने या भेटीनंतर सत्तार भाजपमध्ये प्रवेश करतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.