
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबई ते नाशिक आणि बडोदा मार्गावर नवीन ‘वंदे भारत’च्या धर्तीवर चेन्नईच्या आयसीएफ कारखान्याने तयार केलेल्या नव्या नॉन एसी ‘मेमू’ गाडीची चाचणी पुढच्या आठवडय़ापासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई दौऱयावर आलेले रेल्वे बोर्डाचे सदस्य राजेश अग्रवाल यांनी गुरुवारी येथे दिली. तसेच मध्य आणि पश्चिम रेल्वेला प्रत्येकी सहा अशा मुंबईला एकूण 12 एसी लोकल मिळणार असून एसी लोकलची डहाणूपर्यंत चाचणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईच्या जवळील महानगरांना मुंबईला जोडण्यासाठी ट्रेन -18 तयार करणाऱ्यातंत्रज्ञानी नवीन नॉन एसी ‘मेमू’ गाडी तयार केली असून तिचा वेग आणि प्रवासी क्षमता जादा आहे. या मेमू ट्रेनने नाशिक, पुणे ही महानगरे जवळ येणार असून अवघ्या दोन तासांत त्यांचा प्रवास घडणार आहे. तर मुंबई ते बडोदा अंतर चार तासांत कापले जाणार असल्यामुळे वेगवान प्रवास घडणार असल्याचेही रेल्वे बोर्ड सदस्य (रोलिंग स्टॉक) राजेश अग्रवाल यांनी स्पष्ट केले. यावेळी अतिरिक्त यांत्रिक अभियंते ए. के. अग्रवाल आणि मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक एस. के. जैन उपस्थित होते.
‘वंदे भारत’ मेमूचा वेग प्रति तास 130 कि.मी.
पारंपरिक ‘मेमू’ ट्रेनची प्रवासी क्षमता 2,402 असून नवीन ‘मेमू’ ट्रेनची क्षमता 2,618 इतकी जादा आहे. प्रत्येक डब्यात टॉयलेटची सोय असणार असून स्टेनलेस स्टीलपासून डब्यांची बॉडी बनविण्यात आलेली आहे. ही मेमू ट्रेन जरी नॉन एसी असली तरी मोटरमनची केबिन एसी असणार आहे. ट्रेन जर दर ताशी 130 किलोमीटर वेगाने ही ट्रेन धावणार असून आहे. या ट्रेनचे डबे ट्रेन-18 च्या धर्तीचे असणार आहेत.
नाशिक घाटात लोकल फसल्याने ‘मेमू’
मुंबई ते नाशिक मार्गावर लोकल चालविण्याची मध्य रेल्वेची योजना होती, परंतु घाटातील बोगदे हे लांब पल्ल्यांच्या डब्यांच्या आकाराचे असल्याने आणि लोकलच्या डब्यांचा आकार मोठा असल्याने अडचण आली होती. त्यामुळे आता मेमूची चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
खिसा गार करणारा एसी प्रवास!
पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलची स्वागत सवलतीचे भाडे संपून फर्स्ट क्लासच्या 1.3 पट भाडे 1 जूनपासून लागू झाले असल्याने मध्य रेल्वेला सहा आणि पश्चिम रेल्वेला सहा अशा 12 एसी लोकल टप्प्याटप्प्याने मुंबईत दर महिन्या-दोन महिन्यांनी दाखल होणार असल्याने पारंपरिक लोकलच्या फेऱ्यारद्द होऊन नव्या एसी फेऱयांमधून महागडे तिकीट वाढून प्रवाशांना आता प्रवास करावा लागणार आहे.
पावसात एसी लोकलची चाचणी
मुंबई सध्या मोटर यंत्रणा डब्यांच्या खाली असणारी एसी लोकल आली असून तिच्या संबंधित यंत्रणा डब्यांच्या खाली असल्याने तिची मुंबईच्या पावसात चाचणी घेण्यात येणार आहे. कारण पावसात रुळांवर पाणी साचत असल्याने खबरदारी म्हणून पाण्यातच तिच्या चाचण्या घेण्यात येणार आहेत. या नव्या एसी लोकलची प्रवासी क्षमताही ‘भेल’च्या पहिल्या एसी लोकलपेक्षा जादा आहे. सध्या चर्चगेट ते विरार एसी लोकल धावते. नवीन एसी लोकल डहाणूपर्यंत धावणार आहे. पुढच्या आठवडय़ात नव्या एसी लोकलच्या चाचण्या सुरू होणार असून डहाणूपर्यंत एसी लोकल चालविण्याचा विचार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकलचा वेग वाढविणार
मुंबई उपनगरीय लोकलचा वेग प्रति तास 110 कि.मी. करण्याची गरज असून त्यासाठी ट्रकची क्षमता आणि सिग्नल यंत्रणेला बदलण्याची गरज असून एकूण पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. यंदा रेल्वेने रेकॉर्डब्रेक सहा हजार कोचनिर्मिती केली असून पुढच्या वर्षी आठ हजार कोचनिर्मितीचे लक्ष्य असल्याचे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.


























































