
चोरीच्या गुह्यात अटक केलेल्या अजय सहानी या आरोपीने रुग्णालयातून पळ काढला होता. अखेर सहानीला आझाद मैदान पोलिसांनी अटक केली. आझाद मैदान पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल होता. त्या गुह्यात पोलिसांनी शुक्रवारी आसिफ अन्सारी, चेतन वाघेला आणि अजय सहानीला ताब्यात घेतले. त्या तिघांना वैद्यकीय तपासणीसाठी गोकुळदास तेजपाल रुग्णालयात दाखल केले. पोलीस त्या तिघांचे पेपर काढत असताना, अजयने शौचालया बहाणा केला. पोलीस त्याला तळ मजल्यावरील शौचालयात घेऊन गेले. अजय पळून जाऊ नये म्हणून पोलीस शौचालयाबाहेर उभे राहिले.
काही वेळाने पोलिसाने अजयला आवाज दिला. मात्र आतून काहीच प्रतिसाद आला नाही. पोलिसांनी दरवाजा उघडला तेव्हा अजय हा आत नव्हता. खिडकीच्या काचा काढून अजय पळून गेला होता. या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकायांना कळवण्यात आली. अजयच्या अटकेसाठी पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली. तो एम्पायर सिनेमा परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अखेर पोलिसांनी अजयला अटक केली. अजयला अटक करून आज न्यायालयात हजर केले होते.

























































