अभिनेता अरमान कोहलीला ड्रग्जप्रकरणी अटक; एनसीबीची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) मुंबई युनिटने ड्रग्ज प्रकरणात बिग बॉस फेम अभिनेता अरमान कोहलीला अटक केली आहे. एनसीबीने शनिवारी अरमान कोहलीच्या जुहू येथील घरावर छापा टाकला. त्यावेळी त्याच्या घरात सापडलेले ड्रग्ज एनसीबीने जप्त केले आहे. रात्री उशिरा अरमानला चौकशीसाठी एनसीबीच्या कार्यालयात नेण्यात आले होते. तेथे चौकशीनंतर त्याला एनसीबीने अटक केली आहे.

एनसीबीने एका ड्रग्ज पेडलरला अटक केली होती. त्याच्या चौकशीत अरमानबाबतची माहिती मिळाल्यानंतर एनसीबीने शनिवारी अरमानच्या मुंबईतील घरावर छापा टाकला. छाप्यावेळी अरमानच्या घरात ड्रग्ज आढळले असून एनसीबीने ते जप्त केले आहेत.

अरमानला चौकशीसाठी एनसीबीच्या कार्यालयात नेण्यात आले होते. तेथे चौकशीनंतर अरमानला अटक करण्यात आली. या प्रकरणात बॉलीवूडमधील आणखी कोणाचा समावेश आहे, याबाबत त्याची चौकशी करण्यात येत आहे. त्याच्या चौकशीतून ड्रग्जप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे चौकशीसाठी अरमानला अटक करण्याचे सांगण्यात आले आहे.