ज्येष्ठ अभिनेत्री रिता भादुरी यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
रिता भादुरी

सामना प्रतिनिधी । मुंबई

‘घर हो तो ऐसा’, ‘वीरासत’, ‘कभी हा कभी ना’ यासारख्या सिनेमांसह ‘निमकी मुखिया’ यांसारख्या मालिकांमधून घराघरात लोकप्रिय झालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री रिता भादुरी यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ६२ वर्षांच्या होत्या. दुपारी चकाला येथील पारशीवाडा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

वयाच्या बाराव्या वर्षी रिता यांनी १९६८ साली प्रदर्शित झालेल्या ‘तेरी तलाश’ या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘कन्याकुमारी’, ‘तेरी तलाश’, ‘जुली’, ‘अनुरोध’, ‘नास्तिक’, ‘आईना’, ‘बेटा’ असे अनेक हिट सिनेमे त्यांनी दिले. छोटय़ा पडद्यावरही त्यांच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली. ‘छोटी बहू’, ‘कुमकुम’, ‘साराभाई वर्सेस साराभाई’ अशा त्यांच्या मालिका विशेष गाजल्या. ‘निमकी मुखिया’ मालिकेत त्यांनी साकारलेली इमरती देवीची भूमिका विशेष गाजली. गेल्या काही वर्षांपासून त्या किडनीच्या विकाराने त्रस्त होत्या. रिता यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सतीश शाह, टिकू तलसानिया,शिशिर शर्मा, परितोष साध यांसारख्या छोटय़ा आणि मोठय़ा पडद्यावरील कलाकारांनी हजेरी लावली होती.

कणकवली, वैभववाडी, देवगडमध्ये पाच हजार छत्र्यांचे वाटप

शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या वतीने कणकवली-वैभववाडी-देवगड विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावात २५ याप्रमाणे तब्बल पाच हजार भगव्या छत्र्यांचे वाटप करण्यात आले. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. त्याची दखल घेत सामान्यांना मदतीचा हात देण्यासाठी शाळकरी विद्यार्थ्यांबरोबरच नागरिकांना मोफत छत्रीवाटपाचा उपक्रम राबवला आहे. त्यानुसार मंगळवारी कणकवली तालुक्यातील कुंभवडे येथे अरुण दुधवडकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना छत्री वाटप केले. यावेळी कणकवली विधानसभा प्रमुख शैलेश भोगले, उपजिल्हाप्रमुख राजू शेटय़े, तालुकाप्रमुख सचिन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख ऍड. हर्षद गावडे, तालुकाप्रमुख राजू राठोड, विभागप्रमुख आनंद आचरेकर, कुंभवडे सरपंच आप्पा तावडे, शाखाप्रमुख प्रकाश बिले, समीर सावंत उपस्थित होते.