
सामना प्रतिनिधी । नगर
भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी ख्रिश्चन धर्मियांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेस व ख्रिश्चन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर काळ्याफिती बांधून जोरदार निदर्शने करण्यात आली. तर खा. शेट्टी यांनी सर्व ख्रिश्चन धर्मियांची जाहीर माफी मागण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी युवक काँग्रेसचे शहर जिल्हा सरचिटणीस मयुर पाटोळे, युवकचे अध्यक्ष गौरव ढोणे, बाळासाहेब भुजबळ, रुपसिंग कदम, किरण पवार, राहूल कांडेकर, शुभम शिर्के, श्यामराव वाघस्कर, राजू देठे, आकाश कोरे, रोहन शिंदे, सुरज जोशी, आकाश साळवे, सागर शिंदे, कुमार सोनवणे, ईश्वर जगताप, आशीश कांबळे, आकाश पोळ, सीसल भगत आदींसह ख्रिश्चन समाजाचे व काँग्रेसचे युवक उपस्थित होते.
खा. शेट्टी यांनी मुंबई येथे झालेल्या एका कार्यक्रमात ख्रिश्चन हे मुळ ब्रिटीश असल्याने त्यांनी हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नसल्याचे वादग्रस्त वक्तव्य केल्याने ख्रिश्चन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. भाजपने देखील तातडीने त्यांच्या पदाचा राजीनामा घेण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना देण्यात आले.






























































