अहमदपूर नगरपालिकेतील दोन सभापती व चार विषय समिती सदस्यांचे राजीनामे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अहमदपूर

येथील नगर परिषदेच्या दोन विषय सभापतींनी आणि इतर पाच सदस्यांनी प्रभागातील प्रलंबित कामे आणि नगराध्यक्षाचे पती लक्ष्मीकांत कासनाळे यांच्या मनमानी व अपमानास्पद वागणुकीच्या निषेधार्थ आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.

अहमदपूर नगर परिषदेमध्ये पक्षीय बलाबल पहाता नगराध्यक्षा या भाजपामध्ये आमदार विनायकराव पाटील गटाच्या आहेत. नगरसेवकाचे पक्षीय बलाबल पहाता भाजप ०९, राष्ट्रवादी ०९, शिवसेना ०२, काँग्रेस आय ०२, बहुजन विकास आघाडी ०१ असे पक्षीय बलाबल आहे. आज राजीनामा दिलेल्या मध्ये कमलबाई आगलावे सभापती बांधकाम समिती (शिवसेना), रेखा गुलाबराव माने सभापती आरोग्य व स्वच्छता समिती (भाजपा), तनूजा सिध्दार्थकूमार सूर्यवंशी, उपसभापती महीला व बाल कल्याण समिती (भाजपा), हनिफा लालखान पठाण, सदस्या शिक्षण समिती (भाजपा), डॉ.फूजेल जागीरदार, सदस्य आरोग्य व स्वच्छता समिती(राष्ट्रवादी काँग्रेस), प्रशांत बाबासाहेब कांबळे सदस्य शिक्षण समिती व आरोग्य व स्वच्छता सदस्य (भाजपा) आदींचा यात समावेश आहे.

प्रामुख्याने आज यातील प्रत्येकांनी आपल्या राजीनामा पत्रात नगरपालिकेवर तथा अध्यक्षांचे पती स्वीकृत नगरसेवक लक्ष्मीकांत कासनाळे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत. बांधकाम सभापती कमलबाई आगलावे यांनी विकास कामे प्रलंबीत असून वारंवार सांगून सुध्दा विषय सुचीवर कामे घेतली जात नाहीत, कामे निकृष्ठ दर्जाचे होत आहेत. वरिष्ठ अधिकारी तक्रारीची दखल घेत नसल्याचे आरोप केला आहे.

आरोग्य व स्वच्छता समितीं सभापती रेखा माने यांनी स्वच्छतेची कामे वेळेवर होत नाहीत नात्यातील व्यक्तीला टेन्डर देऊन मोठा भ्रष्टाचार केला आहे, विद्यानगर येथील नालीसाठी जागा संपादित केली नाही, नव्याने मागविण्यात आलेल्या स्वच्छतेची टेंन्डर विना तांत्रिक मान्यता मागविण्यात आले आहे असा आरोप केला आहे.

तर महीला व बाल कल्याण समिती सभापती तनूजा सिध्दार्थकूमार सूर्यवंशी, हनिफा लालखान पठाण, डॉ.फूजेल जागीरदार व प्रशांत बाबासाहेब कांबळे यांनी आपल्या प्रभागात मंजूर कामे जाणीवपूर्वक केले जात नाहीत. बौध्द नगर येथील रहिवाशांना जाणीवपूर्वक कबालनामे दिले जात नाहीत, दलित वस्तीचा निधी अपुरा दिला जातो, सांगितलेली कामे वेळेवर होत नाहीत. अध्यक्षाचे पती नगरसेवक लक्ष्मीकांत कासनाळे नगरसेवकांना अपमानास्पद वागणूक देतात, प्रशासनाचे कामावर अक्षम्य दूर्लक्ष असे आरोप राजीनामा पत्रात केले आहेत.

राजीनाम्याच्य बाबतीत येथील मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांना विचारले असता राजीनामा पत्र माझ्याकडे आले असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यावर निर्णय घेऊ, असे सांगितले.