
अहमदपूर तालुक्यातील मौजे रुई येथील अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, मौजे रुई येथे राहणारी त्यांची मुलगी सांगवी येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेते. घरात महाविद्यालयात जात असल्याचे सांगून ती गेली मात्र घरी परत आलीच नाही. त्यांनी मुलीच्या मैत्रिणीकडे तसेच नातेवाईकांकडे सर्वत्र चौकशी केली मात्र मुलगी सापडली नाही. त्यामुळे त्यांनी अहमदपूर पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.




























































