एअर इंडियाच्या हैदराबाद- दुबई फ्लाईटला अपहरणाची धमकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Air India Flight to Delhi Cancelled After Bird Strike on Landing in Pune

एअर इंडियाच्या हैदराबादहून दुबईला जाणाऱ्या फ्लाईटला अपहरणाची धमकी मिळाली आहे. सोमवारी ईमेलच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तिने विमानतळ प्राधिकरणाला धमकी असलेल्या ईमेल पाठवला.

त्या ईमेलमध्ये हैदराबाद-दुबई असा प्रवास करणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाईटचं अपहण करण्याची धमकी देण्यात आली होती. विमानतळ प्राधिकरणाने सर्व माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करून तपास सुरू केला आहे. धमकी मिळाल्यानंतर ताबडतोब संबंधित फ्लाईट रिकामी करण्यात आली आणि शोधमोहीम राबवण्यात आली. पण, पोलिसांच्या तपासणीत काहीही संशयास्पद आढळलं नाही.

8 ऑक्टोबर 2023 रोजी संध्याकाळी सात वाजता हा ईमेल करण्यात आला होता. या ईमेलनुसार, फ्लाईटमध्ये बसलेली एक व्यक्ती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयची हेर असून त्यापासून सतर्क राहावं. या फ्लाईटचं अपहरण करण्यात येऊ शकतं, असं या मेलमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर ताबडतोब तपासणी सुरू करण्यात आली.