
मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या चार संस्थांची कार्यालये आता मराठी भाषा भवनाच्या एकाच छताखाली आणण्यात येणार आहेत. या नव्या निर्णयानुसार मरीन लाईन्स येथे होणाऱ्या मराठी भाषा भवनातच या चार संस्थांच्या कार्यालयांना जागा देण्यात येणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी पार पडलेल्या बैठकीत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यासंदर्भात एक सादरीकरण केले होते. या सादरीकरणानुसार मराठी भाषा भवन, बाल विज्ञान पेंद्र, कॉन्फरन्स हॉल, 430 प्रेक्षक क्षमतेचे सभागृह, 170 प्रेक्षक क्षमतेचे अॅम्फी थिएटरचा समावेश आहे. या सादरीकरणानुसार मराठी भाषा भवन होणार आहे. त्याशेजारील जवाहर बालभवनाची जी जागा आहे त्या जागेचा वापरही मराठी भाषा भवनासाठी होणार आहे. यामुळे नव्याने होणारे मराठी भाषा भवन हे 35 हजार स्के.फूट जागेवर उभारण्यात येणार आहे. याअगोदर 23 हजार स्के. फूट जागेवर हे मराठी भाषा भवन बांधण्यात येणार होते. तर हे मराठी भाषा भवन समुद्र किनाऱयालगत असल्यामुळे नियमानुसार 24 मीटरच्या उंचीची मर्यादा पाळण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यासंदर्भात मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या सूचनांनुसार आराखडय़ात बदल केलेले आहेत.

























































