
सामना प्रतिनिधी । बुलढाणा
अमरावती परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन अमरावती परिक्षेत्राचे उपमहानिरिक्षक श्रीकांत तरवडे यांचेहस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलीत करुन करण्यात आले. सुरुवातीला अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातील सहा टिमचा मार्च पाथ झाला.
यावेळी श्रीकांत तरवडे यांनी सर्व टिमच्या खेळाडूंना शुभेच्छा देण्याबरोबर पोलिसांच्या दैनंदीन कामकाजासोबत त्यांच्या खेळाडू वृत्तीस चालना मिळावी म्हणून दरवर्षी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही जास्तीत जास्त खेळाडूंनी राज्यस्तरावर जाऊन गोल्ड मेडल मिळवावे अशा अपेक्षा यावेळी व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी केले. आज दिवसभर झालेल्या सामन्यांचे विजेत्यांना पारितोषिक प्रणिती श्रीकांत तरवडे, निलीमा दिलीप पाटील भुजबळ यांचेहस्ते देण्यात आले. याप्रसंगी सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी सुभाष उबरहंडे व उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेंद्र शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
































































