
सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टवरून अकोला शहरात शनिवारी मध्यरात्री भीषण दंगल उसळली. दोन गटात तुफान दगडफेक, हाणामारी झाली. संतप्त जमावाने वाहनांची जाळपोळ केली. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक जण ठार झाला. दंगलीची ही घटना घडताच अकोला शहरात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला असून परिसरात कलम 144 अंतर्गत संचारबंदी लागू केली आहे.
अकोल्यातील दंगलीवरून राज्याच्या विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी भाजपला फटकारले आहे. ” निवडणुका आहेत, तिथेच दंगली का घडतात? बाकीच्या ठिकाणी दंगली का होत नाहीत? भारतीय जनता पार्टी वेगवेगळ्या पद्धतीने धार्मिक व जातीय रंग देऊन अशा दंगली भडकावण्याचा प्रयत्न करते. म्हणून मला वाटतं की, जनतेनंही सावध राहायला हवं. जनतेनं अशा कोणत्याही दंगलीत सहभागी होऊ नये. विद्यमान सरकार स्वत:च्या स्वार्थासाठी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे

































































