
राजस्थानमधील अशोक गहलोत सरकारच्या मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी तिन्ही मंत्र्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. तसेच ते आज सायंकाळी पाच वाजता राज्यपालांची भेट घेणार असल्याचीही चर्चा सुरू आहे. एकीकडे तीन मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री गहलोत यांच्या निवासस्थानी काँग्रेस नेत्यांच्या बैठकांवर बैठकाही सुरू आहेत.
राजस्थान सरकारमधील गोविंद सिंह डोटासरा, रघू शर्मा आणि हरीश चौधरी यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तिन्ही मंत्र्यांचा राजीनामा मुख्यंत्र्यांनी स्वीकारला आहे. मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर गहलोत यांनी सायंकाळी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे.
मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर गोविंद सिंह डोटासरा यांनी सांगितले की, पक्षाची एक पद एक व्यक्ती या परंपरेचा आणि शिस्त याचा विचार करून आम्ही पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे आमचा राजीनामा सोपवला आहे. तसेच पक्षात कोणतीही गटबाजी नसून नाराजीचा प्रश्नच नसल्याचेही ते म्हणाले.
Jaipur | Keeping the ‘Ek Pad Ek Vyakti’ discipline of the Congress party, we have given our resignations to party president Sonia Gandhi. The cabinet meeting will be at 5 PM, today: Rajasthan Minister Govind Singh Dotasra pic.twitter.com/F2wucyBI4c
— ANI (@ANI) November 20, 2021
दरम्यान, या पार्श्वभूमीवर सायंकाळी मंत्रिमंडळाची बैठक होणार असून या बैठकीत अन्य मंत्र्यांचेही राजीनामे घेतले जावू शकतात. त्यानंतर ते राज्यपालांची भेट घेतली आणि उद्या 21 नोव्हेंबरला नवीन मंत्रिमंडळ स्थापन केले जाईल, अशी शक्यता आहे.




























































