
महागाईने पिचलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला ऐन दिवाळीत कात्री लागणार आहे. अमूलने गुजरात वगळता सर्व राज्यांमध्ये आपल्या गोल्ड फुल क्रीम आणि म्हशीच्या दुधाच्या प्रतिलिटर दरात दोन रुपयांची वाढ केली आहे.
सध्या अमूलच्या फुल क्रीम दुधाचा प्रतिलिटरचा दर 61 रुपये एवढा होता, तो आता 63 रुपये झाला आहे, तर म्हैस दुधाचा दर 63 वरून 65 रुपये झाला आहे.
निवडणुकीमुळे गुजरातमध्ये दरवाढ नाही
अमूलने गुजरात वगळता सर्व राज्यांमध्ये आपल्या दुधाच्या दरात वाढ केली आहे. गुजरात विधानसभेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यामुळेच अमूलने तेथे सरकारच्या दबावाखाली येत आपल्या दुधाच्या दरात वाढ केली नसल्याची चर्चा आहे.
























































