अमूलचे दूध दोन रुपयांनी महागले

174

अमूलसह राज्यातील सर्वच खासगी आणि सहकारी डेअऱयांचे दूध दोन रुपयांनी महागले आहे. त्यानुसार अमूलच्या वाढीव दराची अंमलबजावणी उद्या रविवारपासून होणार आहे, तर राज्यातील खासगी आणि सहकारी दूध संघाचे वाढीव दर सोमवारपासून लागू होणार आहेत. शेतकऱयांकडून खरेदी केल्या जाणाऱया प्रतिलिटर दुधाला 30 रुपये एवढा जादा दर द्यावा लागत आहे. त्यामुळे आर्थिक भार वाढू लागला आहे. तो कमी करण्यासाठी दरवाढ करण्याचा निर्णय दूध संघांनी घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या