‘या’ गिटारची किंमत आहे 70 लाख, काय आहे खास वैशिष्ट्य

प्राचीन वस्तूंचे अनेकांना आकर्षण असते त्यामुळे त्या कितीही पुरातन असल्या तरी त्याच्या किंमतीचा अंदाज लावता येत नाही. अशीच एक प्राचीन वस्तू समोर आली आहे. ही एक अठराव्या शतकातील अॅण्टीक गिटार असून तब्बल 70 लाख रुपये या गिटारची किंमत आहे. काय खास वैशिष्ट्य आहे या गिटारमध्ये ते जाणून घेऊया.

अठराव्या शतकाच्या अखेरीस पॅरिसमध्ये जॅक्स फिलीप मिशेलॉट द्वारे 1775 मध्ये ही ट्रायनॉन गिटार बनवण्यात आली होती. फ्रान्सीसी ऑक्शन हाऊस एगुट्सद्वारे एका दुर्लभ प्रकाराचे उपकरण म्हणून ते सुचिबद्ध केले आहे. ऑक्शन हाऊसनुसार ‘en bateau बोलले जाते. हे गिटार फ्रुटवूडमध्ये आहे. ज्यामध्ये गिटारचा मुख्य भाग हस्तीदंत आणि एबोनी फिललेट्सने सजवण्यात आले आहे. ओपनवर्क हस्तीदंती रोसेट आहे ज्यामध्ये टेम्पल ऑफ लव्हमध्ये कबूतरांची एक जोडीला दाखवले आहे. हेही सांगितले जाते की, हे फ्रान्सच्या महाराणीकडून दिली गेलेली भेट असू शकते. जी तिने मार्कीस दे ला रोचेलॅम्बर्ट-थेव्हॅलेस यांना दिली. तो त्याच्या गटातील सदस्यांपैकी एक आहे.

ऑक्शन लिस्टमध्ये या गोष्टीचे प्रमाण आहे की राणीने त्यांच्या जवळच्या मित्रमैत्रीणींसाठी संगीत वाद्ये खरेदी केले होते. फ्रान्सीसी ऑक्शन हाऊस एगुट्सद्वारे सांगण्यात आले की, आजपर्यंत असा कुठलाच दस्ताऐवज नाही जो सिद्ध करु शकतो की ती गिटार क्विन मेरी एंटोनेट कडून उपहार होता. या माहितीचा विचार केला जाऊ शकतो. एक संगीत इतिहासकार पॅट्रिक बार्बियर आपल्या पुस्तकात मेरी एंटोनेट एट ला म्युझिक मध्ये लिहिले आहे की मेरी एंटोनेट अनेक वाद्ये खरेदी करायची आणि ते स्वेच्छेने जवळच्या लोकांना द्यायची.