कचरा फेकणाऱ्यावर बरसली अनुष्का, विराटने केला व्हिडीओ व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

देशात सध्या कचऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. कितीही अभियानं सुरू केली तरी जो पर्यंत प्रत्येक हिंदुस्थानी व्यक्तीला स्वयंशिस्त लागत नाही, तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. अशाच एका कचरा फेकीच्या घटनेमध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने एका हिंदुस्थानी नागरिकाची शाळा घेतली असून, त्याचा व्हिडीओ तिचा पती आणि हिंदुस्थानी क्रिकेटपटू विराट कोहली याने व्हायरल केला आहे.

आपल्या ट्विटर अकाउंटवरून त्याने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ‘या लोकांना रस्त्यावर कचरा फेकताना पाहिलं आणि त्यांना तिथेच जाब विचारला. मोठ्या गाड्यांमधून फिरतात आणि डोक्याचा जराही वापर करत नाहीत. अशी माणसं आपला देश स्वच्छ ठेवू शकणार आहेत का? जर तुम्ही जर तुमच्या आसपास काही चुकीचं घडताना पाहिलंत, तर असंच करा आणि जनजागृती करा’ अशी कॅप्शनही त्याने व्हिडीओला दिली आहे.