सीबीआय अधिकारी वाद; सरन्यायाधीशांनी ताशेरे ओढत 29 तारखेपर्यंत सुनावणी पुढे ढकलली

33

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सीबीआयच्या माजी अधिकाऱ्यांच्या वादाप्रकरणी मंगळवारी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सुनावणी 29 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. आलोक वर्मा यांनी सीलबंद लिफाफ्यात न्यायालयाला सादर केलेल्या अहवाल फुटला कसा असा सवाल करत गोगोई यांनी पक्षकारांवर कठोर शब्दांत ताशेरे ओढले. तुमच्यापैकी कोणताही पक्ष आज सुनावणीसाठी लायक नसल्याचे सांगत त्यांनी सुनवणी पुढे ढकलली.

मंगळवारी सुनावणीला सुरुवात होताच सरन्यायाधीशांनी आलोक वर्मा यांचे वकील फली नरीमन यांना प्रसारमाध्यमांतील वृत्त दाखवत, वर्मा यांनी सीलबंद लिफाफ्यात न्यायालयाला सोपवलेला अहवाल लिक कसा झाला असा सवाल केला. ही खूप खेदजनक घटना असून अहवालाचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये येणे अयोग्य असल्याचे नरीमन यांनी सांगितले. तसेच अहवाल कसा फुटला याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे ते म्हणाले. यावर सरन्यायाधीशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वर्मा यांनी सोमवारी अहवाल दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले होते. ते यासाठी मुतदवाढ का मागत होते असा सवालही गोगोई यांनी केला. याबाबतही आपल्याला माहिती नसल्याचे फली नरीमन यांनी सांगतले. नरीमन यांच्या उत्तराने संतापलेल्या सरन्यायाधीशांनी पक्षकारांवर कठोर शब्दांत ताशेरे आढले. तुमच्यापैकी कोणाही सुनावणीसाठी लायक नाही असे सांगत सुनावणी 29 तारखेपर्यंत पुढे ढकलली.

सीबीआयचे माजी संचालक आलोक वर्मा यांनी त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत केंद्रीय दक्षता आयोगाच्या अहवालावर आपले उत्तर दाखल केले. न्यायालयाने सोमवापर्यंत याबाबतचा अहवाल देण्यास सांगितले होते. त्यांनी न्यायालयाला सीलंबद लिफाफ्यात सादर केलेला अहवाल लिक झाल्याने सरन्यायाधीशांनी नाराजी व्यक्त करत सुनावणी पुढे ढकलली.

आपली प्रतिक्रिया द्या