
अरुणाचल प्रदेशात अतिशय दुर्गम आणि घनदाट जंगल असलेल्या भागात लष्कराचे ध्रुव हेलिकॉप्टर कोसळले. हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे दोन पायलटसह पाच जवान होते. आतापर्यंत चारजणांचे मृतदेह हाती लागले आहेत. दरम्यान, अपतघातस्थळ हे चीन सीमेपासून अवघ्या 35 किलोमीटरवर आहे. हा भयंकर अपघात शुक्रवारी 10.45 वाजता घडला. सियांगपासून 25 किलोमीटरवर सिंगींग गावाजवळ हेलिकॉप्टर कोसळले. हेलिकॉप्टरमध्ये पाचजण होते. त्यात दोन पायलट होते. अपघातानंतर तत्काळ लष्कर आणि हवाई दलाने बचावकार्य सुरू केले.



























































