आभाळमाया – अंतराळातून साखरपेरणी?

409

>> वैश्विक

आपल्या सूर्यमालेबाहेरच्या एखाद्या ताऱ्याभोवतीच्या कोणा ग्रहावर सूक्ष्म जीव किंवा आपल्यासारखी जीवसृष्टी आहे का? यावरचं संशोधन हा सध्याच्या अ‍ॅस्ट्रोबायॉलॉजी किंवा खगोलजैविकीतील महत्त्वाचा विषय आहे. त्यासाठी मुळात एखाद्या ताऱ्याभोवतीचा ग्रह शोधण्याच्या प्रयत्नाला यश यायला हवं ही जी पूर्वअट होती ती 1995 मध्ये पूर्ण झाली. नुसता कयास नव्हे तर महाश्व (पेगॅसिस) तारका समूहातील 51 क्रमांकाच्या ताऱ्याभोवती एक `ग्रह’ सापडल्याचं सिद्ध झालं. `51-पेगॅसी’ या नावाने तो ओळखला जाऊ लागला. यंदा त्यासंबंधीचे खगोलभौतिकीचा नोबेल पुरस्कार मायकेल मेअर आणि डिडिअर क्वॉलॉज यांना मिळाला.

आपल्या सूर्यासारखे सुमारे 270 अब्ज तारे आपल्याच आकाशगंगेत आहेत याची जाणीव झाल्यावर त्यापैकी सूर्यसदृश किंवा त्याहून लहानमोठ्या ताऱ्यांभोवती ग्रहमालाही असू शकते हा तर्क अनाठायी नव्हता हे सिद्ध झालं. आता प्रश्न आहे की, यापैकी किती ताऱ्यांभोवतीचे किती ग्रह `हॅबिटेबल झोन’ किंवा वसाहतयोग्य क्षेत्रात येतात? तिथे सजीव असलेच तर कसे असतील? आपल्याप्रमाणेच त्यांची जैविक रचना `कार्बन’वर आधारित असेल की अन्य कोणत्या मूलद्रव्यावत विश्वात कार्बनचं प्रमाण प्रचंड असल्याने 99 टक्के शक्यता कर्बाधिाष्ठेत (कार्बन-बेस्ड) जीवांचीच आहे, परंतु दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सिलिकॉनवर आधारित कुठली जीवशृंखला असली तर अजून तरी कल्पना नाही.

असा परग्रहांवरच्या जीवसृष्टीचा शोध घेण्यात प्रगती होत असली तरी आपल्या पृथ्वीवरच्या सजीव र्नििमतीचं म्हणजे पर्यायाने आपल्या सर्वांच्या अस्तित्वाचं कोडं पूर्णपणे उलगडलंय असं नाही. अजूनही त्यावर व्यापक संशोधन सुरू असून नवनव्या गोष्टी समोर येत आहेत. एकदा आमच्याकडे खगोल मंडळात फ्रेंच खगोलतज्ज्ञ ज्याँ क्लॉड पेकर हे आले होते. अनौपचारिक गप्पांमध्ये ते म्हणाले, ‘`विश्वातील जीवसृष्टीचा शोध जरूर घेऊया, पण आपल्या पृथ्वीवरील जीवांची तरी संपूर्ण माहिती आपल्याला मिळाली आहे का?’’ अर्थात संशोधन हे `मल्टिटास्किंग’ पद्धतीने चालतं. विविध गोष्टींवर एकाच वेळी चाललेल्या संशोधनातील एखाद्या भागात किंवा क्षेत्रात एकदम जास्त यश मिळतं.

आता पृथ्वीवरच्या `आपल्या’ जन्माविषयी सांगायचं तर एकपेशीय सजीव लाखो वर्पांपूर्वी आqस्तत्वात आला त्यामागे अमिनो (अथवा अमायनो) अ‍ॅसिडचा वाटा महत्त्वाचा आहे हे ज्ञात झालं. आपल्या पेशींमधील `आरएनए’ आणि `डीएनए’ची साखळी कशी असते ते कोडं उकललं. आता त्यात आणखी भर पडली आहे. त्याचा `अंतराळाशी’ संबंध आहे म्हणून हा लेख.

जपानमधून आलेल्या या `अंतराळी’ वृत्तात म्हटलंय की, 1969 मध्ये ऑस्ट्रेलियात जो अशनी (महापाषण) सापडला तो अर्थातच अंतराळातून पृथ्वीवर धडकलेला होता. त्याचं पृथक्करण करताना त्यात धातूंचे अवशेष आढळले नाहीत. मात्र अशाच प्रकारच्या तीन अंतराळी महापाषाणांच्या अभ्यासात असं आढळलं की, `बायोलॉजिक ब्लॉक’ आणि अमायनो अ‍ॅसिडचे अंश त्यात आढळले. हे अशनी कार्बनसमृद्ध होते. पेशीतील रिबोन्युक्लेईक अ‍ॅसिड किंवा `आरएनए’मध्ये रिबॉस या मूलतत्त्वाबरोबरच शर्करारेणूही आढळले. त्यांचाही `आरएनए’ शोधण्यात मोठा वाटा असावा. आपल्या पेशीतील `डीएनए’च्या आज्ञांचे वहन `आरएनए’द्वारे होत असते.

संशोधन जरासे ाqक्लष्ट आहेच. त्यातला विस्मयकारी भाग म्हणजे अंतराळातील महापाषाणातील `शर्करा’कण फॉर्मोस या प्रक्रियेतून तयार झाले. जैविक निर्मितीच्या मूलपेशींमध्ये असलेल्या घटकात अशा प्रकारे `शर्करा’ असेल तर अंतराळातून झालेल्या या `साखरपेरणी’चा अंश आपल्यात आहे असे म्हणावे लागेल.

पृथ्वीवरचा सजीव पृथ्वीवरच निर्माण झाला की पृथ्वीवर अंतराळातून आला हा कूटप्रश्न संशोधनासाठी ठीक आहे, परंतु `अंतराळातून’ म्हणजे कुठून? पृथ्वी बाहेरून असं फार तर म्हणता येईल. कारण पृथ्वी ही विशाल अंतराळातील एक वस्तू आहे. तेव्हा आसपासच्या घडामोडींचा परिणाम पृथ्वीवर व्हायचाच. तो नेमका कधी, कसा, किती याची नवनवी गणितं मांडताना होणारं संशोधन आपल्याच र्नििमतीचं रहस्य उलगडणारं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या