साखर की गोड विष !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अर्चना रायरीकर, आहारतज्ज्ञ

साखर आवडत नाही अशी लोकं फार कमी असतील ना? केक, पेस्ट्रीज, आइस्क्रीम, लाडू काही नाही तर एक बिस्कीट किंवा थोडा गूळ एखादे चॉकलेट… जिभेवर रेंगाळत राहणारी ही चव, जाम भारी वाटते ना? पण म्हणतात ना ‘वन्स ऑन लिप्स फॉर एव्हर ऑन हिप्स.’ 

अशीच ही साखर फार छळते बरं का…आधी आपण मध गोड म्हणून खायचो.

अचानक काही हजार वर्षांपूर्वी शोध लागला एका रोपाचा जे खाल्यावर लईच गोड गोड लागत होतं. ते म्हणजे ऊस. हिंदुस्थानात साखर 2500 वर्षांपूर्वी आली म्हणजे मानवी इतिहास पाहिला तर फार आधीपासून नाहीच. म्हणजे माणसाचा जो लाखो वर्षाचा इतिहास आहे त्यातील केवळ 1 टक्का काळातदेखील साखर आपल्या इतिहासात उपलब्ध नव्हती. आधी लाखो वर्षे आपण गुहेत राहिलो आणि नैसर्गिक खाल्ले. पण हळूहळू साखर जगभरात पोहोचली. अरब देशातून प्रवास करत करत ती युरोपला पोहोचली. तरीही साखर घेण्याचे प्रमाण मात्र कमी होते, कारण ती उत्पादित करणे अत्यंत महागडे होते. त्यामुळे त्याचे आधी शिल्प तयार करून नुसते त्याच्याकडे बघायचे आणि त्याला व्हाईट गोल्ड असेही म्हटले जायचे. अत्यंत श्रीमंत लोकच हे खाऊ शकत.

सुरुवातीच्या काळात साखर ही औषध म्हणून वापरली जात असे. पुढे युरोप आणि अमेरिकेत उसाची लागवड केली गेली. पण असे म्हणतात की, त्यासाठी आफ्रिकेतून गुलाम आणले गेले आणि त्यांना 18-18 तास कामाला जुंपले जाई आणि त्यांच्यावर अत्याचार केले जात. अशा प्रकारे गोड साखरेला कडू इतिहास तयार झाला. यामुळे हे गुलाम फार वर्ष जगत नसत.

पुढे हेही बंद झालं आणि मग उसाऐवजी बीटपासून साखर बनविण्याची पद्धत सुरू झाली. हेही महागच होते. त्यामुळे केवळ श्रीमंत लोक ही साखर खात आणि जाड होत. हळूहळू साखर स्वस्त झाली आणि घरोघरी पोहोचली. मग त्यापासून
पॅंडी बनू लागल्या. जॅम, जेली असे पदार्थ आले. बिस्किटे केक असे पदार्थ तयार झाले. आज 90 टक्के तयार पदार्थांत साखर आहे. अगदी सॉसमध्ये देखील असते.

आज एक हिंदुस्थानी माणूस सरासरी 10 चमचे म्हणजे जवळ जवळ 18 किलो साखर वर्षाला खातो. जास्त वाटत असेल तर सांगते, अमेरिकन माणूस जवळपास 70 किलो साखर सरासरी वर्षाला खातो. 18 किलो साखर म्हणजे दिवसाला साखरेतून 200 पॅलरीज आणि महिन्याला 6000 पॅलरीज आणि या सगळ्या रिकाम्या कॅलरीज. म्हणजे ज्यात कुठलीही पोषक तत्त्वे नाहीत अशा रिकाम्या कॅलरीज! तरी आपण आज अमेरिका आणि आपल्याकडे तुलना केली तर अमेरिकेचा डायबेटीसमध्ये जगात तिसरा नंबर आहे. आपला मात्र दुसरा आहे आणि आपल्याकडे नंबर एक किलर हार्ट डिझिस तर आहेच. आधी औषध म्हणून वापरली जाणारी साखर कधी ‘मिठा जहर’ बनली हे आपल्याला कळलंच नाही. साखरेचे अनेक दुष्परिणाम आहेत त्याबद्दल परत कधीतरी. तोपर्यंत एक काम करू, थोडी साखर घेऊन त्याचे पाणी करून भिंतीवर लावून बघा कसा फंगस तयार होईल. अशीच ही साखर वाईट जिवाणू आकर्षित करते, कारण त्यांचा खाऊच की हो तो…मग आपल्या पोटात टाकली की येणारच हे विषाणू खायला ही साखर! हे तर काहीच नाही. पुढे कधीतरी… तोपर्यंत थोडा गूळ चालेल बरं का!