
>> अरुणा सरनाईक
फार पूर्वी मानव समूहाने राहायचा. तो समूह एखाद्या कुटुंबासारखा असायचा. जमावाचा, समूहाचा मुख्य माणूस हा मुखिया असायचा. त्याची आज्ञा सर्वजण पाळत असत! तरुण तरुणी एखाद्या विशिष्ट दिवशी आपला सहचर निवडीत असत आणि त्यांचा विवाह करून दिला जात असे. अगदी राजेमहाराजे यांच्या काळापासून स्त्रीयांना आपला सहचर निवडण्याचे स्वातंत्र्य हेते, याची आपल्या इतिहासात उदाहरणे सापडतील. कालोघात विवाहपद्धती बदलत गेली. आधुनिक तंत्रयुगात विवाहबंधदेखील बदलू पाहत आहेत. त्यातील काही बदल स्वागतार्ह आहेत, तर काही अस्वागतार्ह.
विवाह हे एक पवित्र बंधन आहे. साताजन्माचं अतूट नातं!
पवित्र्याचं! जबाबदारी, सामाजिक बांधिलकी असे अनेक पदर या विवाहाच्या नात्याला, भरजरी वस्त्र्ााला आहेत. विवाह म्हणजे दोन मनांचे मिलन, दोन कुटुंबांची एकत्रता असते. केवळ मुलगा मुलगी या बंधनात बांधले जात नाहीत; तर दोन कुटुबांची आपसात घट्ट मैत्री होत असते. जगामध्ये फार थोडया देशांमध्ये विवाहसंस्था, कुटुंब या संकल्पना आहेत. त्यामध्ये आपला देश पहिल्या स्थानावर असावा किंवा आहे असं म्हणूया! पूर्वी आपल्या जातीत, बरोबरीत, प्रांतात लग्नसंबंध जोडले जात असत. अगदी बालवयात विवाह होत असतं! मुलीचे वय जेमतेम पाच-सात वर्षांचे असे आणि मुलाचे वय 10, 11 वर्षांचं असायचे. त्यामुळे मुली अगदी लहानपासून सासरी वळणात वाढत. आईपेक्षा सासूबाई जास्त जवळच्या वाटत. काही काही वेळा तर मुलीच्या केसांचे वळण, विचार, राहणी ही तिच्या आईपेक्षा सासूशी साधर्म्य दाखवीत असे. नेसणं सवरणं सर्व काही सासरचे (अर्थात सासूबाईंसारखे) असे. जणूकाही त्याच मायलेकी आहेत. फार जुना काळ नाही हा! 50,60 वर्षांपूर्वीचा असावा. एकत्र कुटुंबसंस्था होती. 25, 30 माणसांचा परिवार होत असे. आतेघरी एक तरी मुलगी नादंत असे. त्यात दोन्हीकडून फायदा होता. एकतरी सून आपल्या भावाची मुलगी असावी, असा आग्रह धरला जायचा. सणवार, उत्सव साग्रसंगीत साजरे होत असत. केवळ हिंदुस्थानात नाही तर युरोप, इंग्लड, बेल्झयिम जर्मन या देशामध्ये आजही विवाहाला आणि एकत्र कुटुंबाला आदराची मान्यता आहे. विवाहामुळेच कुटुंबसंस्था आजही टिकून आहे. यामुळेच नातेसंबंध मानसिक स्वास्थ अजूनही आहे.
फार पूर्वी मानव समूहाने राहायचा. तो समूह एखाद्या कुटुंबासारखा असायचा. जमावाचा, समूहाचा मुख्य माणूस हा मुखिया असायचा. त्याची आज्ञा सर्वजण पाळत असत! संकटाशी लढतांना समूहाला या मुखियाकडून सरंक्षण मिळत असे. तरुण तरुणी एखाद्या विशिष्ट दिवशी आपला सहचर निवडीत असत आणि त्यांचा विवाह करून दिला जात असे. अगदी राजेमहाराजे यांच्या काळापासून स्त्र्ायांना आपला सहचर निवडण्याचे स्वातंत्र्य हेते, याची आपल्या पुराणात इतिहासात उदाहरणे सापडतील. स्वंयवर पद्धती अस्तित्वात होती. गांधर्वविवाह, राक्षसविवाह असे अनेक प्रकारचे विवाह अस्तित्वात होते. गांर्धवविवाहाचे प्रसिद्ध उदाहरण दुष्यंत-शकुंतला होय. त्यांची प्रेमकथा आजही सर्वांच्या स्मरणात आहे. द्रौपदी स्वंयवर, रुक्मिणी स्वयंवर, सत्यवान-सावित्री, पृथ्वीराज- संयुक्ता ही सारी स्वंयवर विवाहाची जगप्रसिद्ध उदाहरणे होत. यातील काही विवाहांनी आनंद दिला, तर काही विवाहांनी महाभारत जन्माला घातले. राक्षसविवाह म्हणजे एकतर्फी प्रेमाचा आविष्कार; पण तोही मान्य होता. ही सारी उदाहरणे पुराणातील, इतिहासातील होत. आजही ती समाजमान्य आहेत आणि त्याही काळात त्याला समाजमान्यता होतीच होती.
काळानुसार विवाह पद्धती बदलत गेल्या. परकीय आक्रमणे झाली. इंग्रजाचे राज्य आले. स्त्र्ााr पडद्यात गेली. मनाविरूद्ध लादलेल्या विवाहाला बळी पडली. काही राजकारणं विवाहाच्या मांडवात शिजू लागली. जोधाराणी-अकबर बादशहा यांचा विवाह, हा राजकीय सौदा होता. आपले राज्य वाचविण्यासाठी जोधाराणीला मुस्लिम बादशहाशी मनाविरुद्ध विवाह करावा लागला. मात्र तिचे हिंदुत्त्व अकबर बादशहाने आदरपूर्वक जपले. अशी काही कारणास्तव झालेली लग्ने कालांतराने सुखाची ठरलेली होती. छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर किती अल्पकाळाचे वैवाहिक जीवन जगले ! सारं काही स्वराज्याला-देशाला अर्पण करून होते. असो. थोडे विषयांतर जरूर झाले. पण विवाह! आज स्वरुप पालटत आहे. काळानुसार प्रत्येक संकल्पना बदलत गेल्या आहेत. बदल हा सृष्टीचा स्थायीभाव. पण म्हणून विवाह परंपरेत झालेला प्रत्येक बदल चांगलाच आहे, असे आपण म्हणू शकत नाही. बदलं अपरिहार्य जरूर आहेत. पण भावना बदलायला नकोत. तेच नेमकं आज सर्वत्र दिसू येत आहे.
आजच्या आधुनिक तंत्रयुगात विवाहबंधदेखील बदलू पहात आहे. मान्य आहे, की जीवनाची गतीमानता आधीपेक्षा खूप वाढती आहे आणि दिवसेंदिवस अधिक वाढणार आहे! मधल्या काळात विवाह अगदी थोडक्या दिवसांत होत असे. म्हणजे दोन दिवस किंवा तीन दिवस! घरोघरी लग्नाच्या अक्षता, आमंत्रण जात असे. गरीब-श्रीमंत असा फारसा भेदभाव नसे. सर्वकाही घरी तयार व्हायचे. नवरी मुलगी ब्रायडल मेकअपच्या पॅकेजच्या वगैरेच्या भानगडीत पडत नसे. मुलीची आई, मावशी या तर जेमतेम लग्नाच्या वेळेपावतो कशाबशा तयार होत असत. ताटापाटांची जेवणं, आसनं, पंगतीत घरच्या बायका, मुली वाढीत असतं! त्यातच बरीच लग्नं जमायची आणि व्हायची. आजही तोच प्रकार आहे. पण विवाहाची पद्धती, संकल्पना बदलत गेल्यात. लग्न ठरल्यापासून होईपर्यंत पाण्यासारखा पैसा वाहतो. आज मराठी कुटुंबातील विवाहदेखील आपले स्वरूप बदलत आहेत. लग्न ठरल्यावर पहिली धाव ब्युटीपार्लरला घेतली जाते. वाईट काहीच नाही. पण आजकाल अतिरेक होतो. मेहंदी, संगीत, कॉकटेल पार्टीज, रिसेप्शन असा 8 ते 10 दिवसांचा लग्नसोहळा सर्वत्र पाहायला मिळतो. संस्कार कमी आणि बाकीच्या गोष्टी अधिक असतात. मुलीने सासरी कसे वागावे याचा सल्ला आया-आजांनी द्यायची सोय हल्ली राहिलेली नाही. उलट मुलीच्या बरोबरीने दिसण्यात आया रमलेल्या असतात. ‘अगोबाई अगदी वाटत नाही. तुम्ही आई आहात? मोठी बहीण वाटता’ अशी कमेंट मिळविण्यात मुलीची आई गुंतलेली असते. वयाबरोबर वागा आणि छान दिसा असं का वाटतं नाही? बदलत्या विवाह संकल्पनेतील ही एक मोठी शोकांतिका आहे. पाण्यासारखा पैसा वाहतो. तरीपण समाधान वाटत नाही.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लग्न किती दिवस टिकेल, हेही सांगता येत नाही. स्वभावाला वळण घालणं,परिस्थितीशी सामंजस्यानं सामोरं जाणं ही जमवून घेण्याची क्षमताच कमी होत चाललीय. बदलत्या काळानुसार आधुनिक जरूर असावं, व्हावं; पण सर्वांना धरून राहावं.
मागील दोन वर्षांपासून विवाह संकल्पना अजूनच बदलली आहे. जमावबंदी, सोशल डिस्टिन्सिंग यामुळे लग्नांमध्ये आमंत्रिताची संख्या रोडावली जरूर. पण कार्यक्रम मात्र कमी झाले नाहीत. हौसेला मोल नाही, हेच खरचं! कोरोनाने मात्र खूपच बदल घडून आला. यात एक गंमत अशी की आपण कोणाच्या खूप जवळचे आहोत की नाही, याचा
शोध प्रत्येक जण घेऊ लागलाय!
दूरदर्शन मालिकांनी या लग्नसंस्थेत अधिकच भर घातली आहे. किती प्रकारांनी लग्न होऊ शकतात, त्याचप्रमाणे कशाप्रकारची विघ्न येऊ शकतात हे या मालिकांनी दाखवून दिल! एकंदर काळानुसार संकल्पना बदलली आहे. त्यातील काही बदल निश्चितच स्वागतार्ह आहेत, यात शंकाच नाही. शेवटी काय तर कालाय तस्मै नः!





























































