
>> अजित कवटकर
पृथ्वीवर जीवन रुजले, उमलले, बहरले ते केवळ पाण्यामुळेच. पाणी नाही तर वनस्पतीसृष्टी नाही, प्राणवायू नाही आणि काही काही नाही. पाण्यावरील आपले अवलंबन एवढे सुस्पष्ट असतानादेखील आपण आपल्या आपमतलबीपणापुढे त्याकडे दुर्लक्ष करतो आहोत. आपण इथे वाया घालवणारा शुद्ध पाण्याचा प्रत्येक थेंब, तिथे पुठे तरी पुणाच्या तरी जिवात जीव घालू शकला असता. सगळे समजूनदेखील उमजत नाही त्या प्रकारे या विषयावर आजपर्यंत झालेले प्रबोधन हे ‘पालथ्या घडय़ावर पाणी’ टाकल्यासारखे जाणवत आहे.
पंचमहाभूतांपैकी एक, ज्यास मानवाने देवरूपात पाहिले, ते म्हणजे पाणी. पाण्याविना जीवन शक्य नाही आणि म्हणून पाणी म्हणजेच जीवन. हे जीवनावश्यक पाणी निसर्ग पृपेने पृथ्वीला पर्याप्त प्रमाणात लाभत असले तरी त्याचा इतका निष्काळजीपणाने अपव्यय होत आहे की, त्यातून निर्माण होत असलेल्या कमतरतेमुळे उद्या पाण्यासाठी तिसरे महायुद्ध होण्याची संभाव्यतादेखील कोणीच नाकारणार नाही. पैशाच्या बाबतीत जसं एक एक रुपया जोडून संचय केला जातो व तो खर्च करताना जी दक्षता, काटकसर दाखवली जाते त्याचप्रमाणे, पाण्याची साठवणूक व वापर करताना जर तशाच प्रकारच्या जबाबदारीचे व कर्तव्याचे भान प्रत्येकाने राखले तर भेडसावणारी पाण्याची कमतरता दूर होऊन निसर्ग व जीवन हे समृद्ध, संपन्न होईल.
पृथ्वीचा 71 टक्के भाग जरी पाण्याने व्यापला असला तरी, त्यातील केवळ 3 टक्के साठा हा शुद्ध स्वरूपात आहे, परंतु अंदाजे 2 टक्के साठा हा हिमनद्या, बर्फाच्या रूपात असल्याकारणाने मानवाला उपभोगासाठी पृथ्वीवरील एपूण पाणीसाठय़ापैकी 1 टक्केपेक्षा कमी साठा उपलब्ध आहे. या 1 टक्के जलसाठय़ापैकी आपण आजतागायत 0.5 टक्के जलसाठा हा आपल्या अविचारी, असंवेदनशील व स्वार्थी व्यावहारिकतेमुळे दूषित केलेला आहे. म्हणजे उरतो केवळ 0.5 टक्के, पण यातील अर्ध्याहून अधिक पाण्याचा वापर जर शेतीसाठी केला जात असेल तर मानवाच्या उर्वरित गरजा भागवण्यासाठी मग उरते ते किती? जगातील लोकसंख्येचे वाढते प्रमाण, फोफावलेला उपभोक्तावाद, विस्तारणारे शहरीकरण, औद्योगिकीकरण यांमुळे या उर्वरित शुद्ध पाण्याचेही दूषितीकरण होण्यास वेळ नाही लागणार.
अनुमान आहे की, 2025 पर्यंत अर्ध जग हे पाणीटंचाईच्या सावटाखाली आलेलं असणार. आजही प्रति दिवशी सहा हजार बालपं पाण्याशी संबंधित रोगांना बळी पडत आहेत. आज जवळजवळ दोन अब्ज लोकसंख्या ही दूषित पाणी पिऊन जगत आहे. 2050 पर्यंत वाढलेली लोकसंख्या ही आजच्याहून 50 टक्के अधिक पाण्याची मागणी करणार, पण भूजलपातळी मात्र तेव्हा पैक पटीने अधिक आटलेली असणार आणि अनेक नद्या या शुद्ध करण्याच्या पलीकडे दूषित केल्या गेलेल्या असणार. लोकांमधील या विषयाची वाढणारी बेपर्वाई पाहता, मानवच मानवाच्या आणि एपूणच या वसुंधरेच्या विध्वंसाला कारणीभूत ठरणार असे दिसते. हिंदुस्थानी संस्कार-संस्पृतीत पाण्याला दिले गेलेले स्थान हे त्याचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करते. आदिमानव खऱया अर्थाने सुसंस्कारी किंवा माणूस झाल्याचे तेव्हा म्हणता येईल, जेव्हा तो नदीकिनारी वस्तीस म्हणजे पाण्याच्या सान्निध्यात आला. अन्न निर्माण करण्यासाठी, अन्न शिजवण्यासाठी व पुढे खाल्लेल्या अन्नाचे आरोग्यादायी पचन करण्यासाठी पाण्याच्या अनिवार्यतेला पर्याय नाही. धार्मिक विधींमध्ये पाणी शिंपडून सगळे सात्विक करण्याचे शुद्धीकरण संस्कार असो किंवा जेवणाला सुरुवात करण्यापूर्वी ताटाभोवती पाणी सोडण्याची पद्धत असो, पाण्याने याहीपुढे जाऊन धर्म-संस्पृतीच्या मानवतावादी विचारधारेवरदेखील आपली निर्मळता बिंबवली आहे. अशा या जीवनदायी पदार्थाचा अपव्यय करून, दूषित करून आपण आपल्याच हुशारी व प्रगल्भतेविषयी शंका निर्माण करत आहोत.
इस्रायल या देशाचा 60 टक्क्यांहून अधिक भाग हा वाळवंटी प्रदेश आहे. त्यात तेथील पावसाचे प्रमाणही अतिशय अल्प. तसे असतानाही त्यांची जलदुर्भिक्षतेतून जलसंपन्नतेकडची वाटचाल ही थक्क करणारी आहे. वापरले गेलेले जवळजवळ 90 टक्के पाणी हे पुनर्चक्रीकरण प्रक्रियेतून पुन्हा वापरात आणले जाते. त्यांच्या विक्षारण (डिसँलिनेशन) तंत्रज्ञानाला तोड नाही आणि त्यातूनच आज त्यांची शुद्ध पाण्याची तहान ही मोठय़ा प्रमाणात भागवली जात आहे. ठिबक सिंचन हा तिथलाच आविष्कार आणि त्याच्या कार्यक्षम वापरातून ते आज अंदाजे 30 टक्के पाणी वाचवत आहेत आणि अशी काटकसर करत असतानादेखील त्यांच्या शेती उत्पादनाने देशांतर्गत गरज पूर्ण करून निर्यात करण्याएवढी क्षमता गाठलेली आहे. पावसाचा प्रत्येक थेंब अडवा, जिरवा आणि तो अतिशय जपून वापरा हा जणू तिथला राष्ट्रमंत्रच झाला आहे. प्रत्येक नागरिक त्यास एक कर्तव्य म्हणूनच बघतो. कारण त्याविषयीचे संस्कार अगदी बालवयापासूनच शिक्षणाच्या माध्यमातून त्यांवर सातत्याने होत असतात.
विकसित शहरातील उच्चभ्रू वस्तीतील एखादा परिवार एका वेळेला दात घासताना जेवढं पाणी वापरतो त्या तेवढय़ाच पण दूषित पाण्याने कोणत्या तरी दुर्गम दुष्काळग्रस्त भागातील एखाद्या गरीब परिवाराला आपली दिवसभराची तहान शमवणे भाग असते. आदल्या दिवशी भरलेले पाणी शिळं म्हणून ओतून टाकण्याची सवय म्हणजे सपशेल अज्ञानच म्हणावे. गंजलेले पाइप, बिघडलेले नळ यांमुळे होणारी पाण्याची गळती जरी वेळीच रोखली तरी पाण्यासाठी पुणाला वणवण करावी लागणार नाही. ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ला प्राधान्याने शक्य तिथे अनिवार्य करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी लागणाऱया विकसित तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करणे हे येणाऱया पिढय़ांसाठी परोपकार ठरेल. ग्रामीण भागांतील पारंपरिक जलसिंचन पद्धतींना पुनरुजीवित करणे, कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचे तंत्र सर्वांना अवगत करून देणे, सर्वत्र मोठय़ा प्रमाणात वृक्ष लागवड करणे, शुद्ध पाण्याचे मोठय़ा प्रमाणात होत असलेले बाष्पीभवन पर्यावरणस्नेही पद्धतीने रोखण्याच्या उपाययोजना करणे, जलसाक्षरतेच्या अभियानातून जलसंवर्धनाची एक चळवळ उभारणे, पाण्याच्या पुनर्वापर पद्धतींचा प्रसार, प्रचार करणे, जलप्रदूषण करणाऱयांवर कठोर कायद्यांची दहशत बसविणे आवश्यक आहे.
पृथ्वीवर जीवन रूजले, उमलले, बहरले ते केवळ पाण्यामुळेच. पाणी नाही तर वनस्पतीसृष्टी नाही, प्राणवायू नाही आणि काही काही नाही. पाण्यावरील आपले अवलंबन एवढे सुस्पष्ट असतानादेखील आपण आपल्या आपमतलबीपणापुढे त्याकडे दुर्लक्ष करतो आहोत. आपण इथे वाया घालवणारा शुद्ध पाण्याचा प्रत्येक थेंब, तिथे पुठे तरी पुणाच्या तरी जिवात जीव घालू शकला असता. सगळे समजूनदेखील उमजत नाही त्या प्रकारे या विषयावर आजपर्यंत झालेले प्रबोधन हे ‘पालथ्या घडय़ावर पाणी’ टाकल्यासारखे जाणवत आहे. शॉवर घेताना, पाणी उपसताना एक विचार नेहमी मनात येऊ द्या की, आपण शेकडो लिटर शुद्ध पाणी एक वेळेच्या आंघोळीसाठी वाया घालविले, पण त्यातील काही वाचवता आले असते तर एखाद्याला जीवदान लाभले असते.





























































