
24 ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या अकरावीच्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीतून दहावीच्या विद्यार्थ्यांचा कल सायन्स शाखेकडे असल्याचे समोर आले होते. त्यानुसार आज शुक्रवारी जाहीर झालेल्या प्रवेशाच्या पहिल्य गुणवत्ता यादीतही याचा प्रत्यय आला. सायन्स शाखेचा कटऑफही यंदा वाढला असून गेल्या वर्षीपेक्षा या शाखेत पहिल्या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढली आहे. गेल्या वर्षी पहिल्या यादीत 37 हजार 976 विद्यार्थ्यांना सायन्स शाखेत तर अनुक्रमे 66 हजार 140 आणि 12 हजार 502 विद्यार्थ्यांना कॉमर्स आणि आर्टस् शाखेत प्रवेश मिळाला आहे. कॉमर्स शाखेत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा कमी आहे. पहिल्या गुणवत्ता यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेण्यासाठी 30 ऑगस्टपर्यंत मुदत आहे.
केसी कॉलेजचा सायन्स शाखेचा कटऑफ 90 टक्के आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा कटऑफमध्ये पॉइंट 6 टक्क्यांची वाढ झाली आहे आहे. मुंबईतील नामांकित रुईया आणि पोदार कॉलेजच्या कटऑफमध्येही यंदा घट झाली आहे. रुईयाचा सायन्स शाखेचा गेल्या वर्षीचा कटऑफ 94.8 इतका होता तो यंदा 93.4 झाला आहे. तर आर्टस्चा कटऑफ 94.2 वरून यंदा 93 वर आला आहे. पोदारचा कॉमर्सचा कट ऑफ 94.2 वरून 92.8 वर आला आहे. साठय़े कॉलेजचा कटऑफमध्ये मोठी घट झाली असून गेल्या वर्षी आर्टस्, कॉमर्स आणि सायन्सचा कटऑफ अनुक्रमे 85.8 टक्के, 91 टक्के आणि 92.8 टक्के होता. तो यंदा अनुक्रमे 79.8 टक्के, 88.6 टक्के आणि 89.2 टक्क्यांवर आला आहे. एनएम कॉलेजचा कॉमर्सचा कटऑफ गेल्या वर्षीइतकाच 94 टक्के आहे.
z ज्या विद्यार्थ्यांना 2 ते 10 पसंतीक्रमावरील कॉलेज अलॉट झाले आहे अशा विद्यार्थ्यांना त्या कॉलेजमध्ये प्रवेश हवा असल्यास ते दिलेल्या मुदतीत संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेऊ शकतात. जर प्रवेश नको असल्यास असे विद्यार्थी दुसऱया गुणवत्ता यादीची वाट पाहू शकतात. दुसऱया गुणवत्ता यादीचे वेळापत्रक ऑनलाइन प्रवेशाच्या वेबसाईटवर जाहीर केले जाणार आहे.
आर्थिक दुर्बल घटकातील 14 हजार जागांसाठी 281 अर्ज
आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या ईडब्ल्यूएस या गटाला विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. ईडब्ल्यूएससाठी एकूण 14 हजार 446 जागा उपलब्ध असून त्यासाठी पहिल्या यादीत केवळ 281 विद्यार्थ्यांनीच अर्ज केले आहेत. यातील 273 विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत प्रवेश मिळाला आहे. तसेच पहिल्या गुणवत्ता यादीत एसएससीच्या 1 लाख 5 हजार 868, सीबीएसई 3 हजार 810, आयसीएसई 7 हजार 167, आयजीसीएसई 571, एनआयओएस 16 आणि इतर शिक्षण मंडळातील 29 विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झाले आहे.
मुंबईतील काही कॉलेजांचा कटऑफ
कॉलेज आर्टस् कॉमर्स सायन्स
एचआर – 93.4 –
केसी 88.2 91.4 90
रुईया 93 – 93.4
पोदार – 92.8 –
रुपारेल 88 90.4 91.6
साठये 79.8 88.6 89.2
डहाणूकर – 90.8 –
भवन्स 81.4 82 87.6
मिठीबाई 89.6 91.6 90
एनएम – 94 –
वझे केळकर 89 91.8 93.6
मुलुंड कॉलेज – 91.8 –
सीएचएम 71.4 86 92
फादर अॅग्नेल – 85.6 93.4
झेवियर्स 95.2 – 92.8
जयहिंद 91.6 92 89
पहिल्या गुणवत्ता यादीतील प्रवेशाची स्थिती
z उपलब्ध जागा ः 1,97,171 z अर्ज केलेले विद्यार्थी ः 1,91,093 z प्रवेश मिळाला ः 1,17,883 z पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळालेले विद्यार्थी ः 48,788 z दुसऱया पसंतीचे कॉलेज मिळालेले विद्यार्थी ः 18,804 z तिसऱया पसंतीचे कॉलेज मिळालेले विद्यार्थी ः 12,799 z सायन्स शाखेतील प्रवेश ः 40, 354 z कॉमर्स प्रवेश ः 65, 028 z आर्टस् प्रवेश ः 11, 768 z एचएसव्हीसी प्रवेश ः 733
























































