दात चमकवायला गेला, ब्रश गिळला; पोटात सुरू झाले ढिशूम ढिशूम…

tooth-brush-paste

दात घासणे हा दैनंदिन जीवनातील चांगल्या सवयीचा भाग आहे. मात्र कधी कधी चांगली सवय आपल्याच चुकीमुळे आपल्याच अंगाशी येते. अशीच एक घटनात अरुणाचल प्रदेशातील एका व्यक्तीसोबत घडली आहे. दात घासताना या व्यक्तीच्या हातातून ब्रश निसटला आणि थेट गिळला गेला. मग सुरू झाली पळापळ.

टाइम्स नाऊने हे वृत्तप्रसिद्ध केले आहे. या घटनेमुळे तो व्यक्ती अस्वस्थ होता. त्याने तातडीने ही बाब आपल्या कुटुंबीयांना सांगितली. मग त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती ढासळू नये म्हणून त्याला बाकिन पर्टिन जनरल हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले.

हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर त्याचा एक्सरे काढण्यात आला. परंतु गळ्याच्या भागात काही दिसले नाही. त्यानंतर त्याच्या पोटाची तपासणी करण्यात आली. त्यावेळी ब्रश पोटात अडकल्याचे डॉक्टरांना कळले. संपूर्ण तपासणी नंतर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. 30 ते 35 मिनिटे शस्त्रक्रिया सुरू होती. यानंतर तो पूर्ण बरा झाल्यावर हॉस्पिटलमधून त्याला घरी सोडण्यात आले. मात्र या व्यक्तीकडून ब्रश कसा गिळला गेला असा प्रश्न डॉक्टरांना देखील पडला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या