अश्विनी बिद्रे खून प्रकरण : राजू पाटीलला दोषमुक्त करा, कुंदन भंडारीला जामिन द्या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ashwini_bidre

सामना प्रतिनिधी । अलिबाग

पोलीस उपनिरीक्षक अश्विनी बिद्रे खून प्रकरणातील आरोपी ज्ञानदेव उर्फ राजू पाटील याचा या प्रकरणात सहभाग असल्‍याचा कोणताही पुराव नसल्‍याने त्‍याला दोषमुक्‍त करण्‍यात यावे अशा आशयाचा अर्ज आज जिल्हा सत्र न्यायालयात त्‍याचे वकील अ‍ॅड. प्रसाद पाटील यांनी सादर केला. तर आरोपी कुंदन भंडारी याचा जामिनासाठीचा अर्ज त्‍याच्‍या वकिलांनी सादर केला आहे. या दोन्ही अर्जावर सुनावणी 8 जानेवारी रोजी जिल्हा सत्र न्यायाधीश मल्लशेट्टी यांच्या न्यायालयात होणार आहे.

अश्विनी बिद्रे खून प्रकरणाची सुनावणी अलिबाग येथील सत्र न्यायालयात सुरू आहे. आज 2 जानेवारी रोजी आरोपी जेलबदली अर्जाबाबत सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी आज होवू शकली नाही. यापूर्वीही राजू पाटील यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. या प्रकरणातील तिसरा आरोपी कुंदन भंडारी याचा जामीनासाठीचा अर्ज न्यायालयात त्‍याच्‍या वकीलांनी सादर केला आहे.

अश्विनी बिंद्रे खून प्रकरणातील मुख्य आरोपी अभय कुरंदकर व कुंदन भंडारी याना आज न्यायालयात हजर करण्‍यात आले नव्हते. तर महेश फळणीकर याला न्यायालयात हजर केले होते. न्‍यायालयाने पुढील सुनावणी 8 जानेवारी रोजी निश्चित केली आहे.