
एशियन गेम्समध्ये हिंदुस्थानच्या नावे प्रथमच एक ऐतिहासिक नोंद होणार आहे. या स्पर्धेत लवकरच हिंदुस्थान 100 पदकांचा टप्पा गाठणार आहे. ही हिंदुस्थानची एशियन गेम्समधील सर्वोत्तम कामगिरी ठरेल. सध्या हिंदुस्थानच्या खात्यात 93 पदकं आहेत. अजून सात पदकांचा टप्पा पार केला की हिंदुस्थान प्रथमच 100 पदकांचा टप्पा पार करेल.
कोणती आहेत ती पदके?
कबड्डी – 2 पदके (दोन्ही संघ अंतिम फेरीत)
तिरंदाजी – 3 पदके (पुरुष एकेरी स्पर्धेत अंतिम सामन्यात दोन्ही खेळाडू हिंदुस्थानी) (महिला एकेरीच्या अंतिम फेरीत हिंदुस्थानची ज्योती)
क्रिकेट – 1 पदक (हिंदुस्थानी संघ अंतिम फेरीत)
बॅडमिंटन – 1 पदक (सुवर्ण किंवा रौप्य)
























































