
टीम इंडियाचा खेळाडू केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी लवकरच लग्नाच्या बेडीमध्ये अडकणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून दोघांमध्ये गुटरगू सुरू असल्याच्या चर्चा रंगत होत्या. या दोघांनीही कोणापासून काहीही लपवून ठेवले नाही आणि आपल्या प्रेमाची खुलेआम कबुलीही अनेकदा दिली. आता दोघांच्या नात्याला नवे नाव मिळणार आहे.
केएल राहुल आणि अभिनेता सुनिल शेट्टीची मुलगी अथिया आगामी तीन महिन्यांमध्ये लग्नाचा बार उडवून देणार आहेत. ‘इंडिया टूडे’शी बोलताना अथिया शेट्टी हिच्या जवळच्या सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. राहुल आणि अथिया तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आता त्यांना लग्नाचा निर्णय घेतला आहे. दोघांच्या लग्नाची तयारीही सुरू झाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, राहुलच्या पालकांनी नुकतीच मुंबईमध्ये अथिया शेट्टी हिच्या कुटुंबाची भेट घेतली. अथिया आणि राहुल आपल्या कुटुंबियांसोबत नवीन घर पाहण्यासाठीही गेले होते. लग्नानंतर हे दोघे नव्या घरामध्ये रहायला जाणार आहेत. तीन महिन्यात हे जोडपे विवाहबद्ध होणार असून मुंबईतच हा विवाहसोहळा पार पडणार आहे. दोन्ही कुटुंबियांनी धुमधडाक्यामध्ये लग्न करायचे ठरवले आहे. स्वत: अथिया लग्नसोहळ्यात काहीही कमी राहायला नको म्हणून जातीने लक्ष देतेय.
View this post on Instagram
याआधी राहुल आणि अथिया गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये लग्न करणार अशा वावड्या उठल्या होत्या. परंतु हे दोघे आता या वर्षी ‘एक दुजे के’ होणार असल्याची माहिती मिळत आहे. बॉलिवूडमधील कलाकार आणि क्रिकेट खेळाडू या दोघांच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी उत्सुक आहेत.
दरम्यान, केएल राहुल आणि अथिया शेट्टी तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. एकमेकांप्रती प्रेम दाखवण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. दोघेही एकमेकांसोबत खास क्षणांचे फोटोही शेअर करतात.
View this post on Instagram




























































