संभाजीनगरच्या प्राणीसंग्रहालयात वाघीणीने दोन पांढर्‍या वाघांना दिला जन्म

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संभाजीनगरच्या सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयात भक्ती वाघिणीने दोन पांढर्‍या वाघांना जन्म दिला आहे.  त्यामुळे प्राणिसंग्रहालयातील पांढर्‍या वाघांची संख्या 5 झाली आहे.

प्राणिसंग्रहालयाचे संचालक विजय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही बछड्यांची तब्येत स्थिर आहे. भक्ती वाघिणीने आपल्या बछड्यांना अजून दूध पाजलेले नाही, म्हणून त्यांना बकरीचे दूध पाजण्यात आले आहेत. डॉक्टरांची एक टीम या बछड्यांवर लक्ष ठेवून आहेत अशी पाटील यांनी नमूद केले.